Crime News : सोडा...आम्हाला जाऊ द्या! दुसऱ्या धर्मातल्या मुलांसोबत फिरताना दिसली, मुलीला टोळक्याने बेदम मारलं
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:SIDHARTH GODAM
Last Updated:
Crime News : दुसर्या धर्मातील मुलासोबत का फिरते, असा जाब विचारत टोळक्याने मुलीला बेदम मारले. त्याशिवाय, त्यांनी मुलालादेखील मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून आरोपींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मागील काही काळात मोराल पोलिसिंग करणाऱ्या टोळक्यांची संख्या वाढली असल्याचे म्हटले जाते. लोकांच्या खाण्यापासून ते कोणी कुठं आणि कोणासोबत प्रेम करावे हे सांगणारी टोळी उगवली असल्याचीदेखील चर्चा होते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आहे. दुसर्या धर्मातील मुलासोबत का फिरते, असा जाब विचारत टोळक्याने मुलीला बेदम मारले. त्याशिवाय, त्यांनी मुलालादेखील मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून आरोपींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील म्हैसमाळा परिसरात फिरायला गेलेल्या एका प्रेमयुगुलावर स्थानिक तरुणांच्या टोळक्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवक-युवती फिरण्यासाठी म्हैसमाळा येथे गेले होते. त्यावेळी काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले आणि नाव विचारले. युवकाने ओळख सांगितल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. “तू दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत का फिरतोस? आपल्या धर्मात मुले नाहीत का?” असा प्रश्न विचारत आरोपींनी मुलीलादेखील बेदम मारहाण केली.
advertisement
अमानुषपणे बुक्क्यांनी होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी तरुणीचा आक्रोश सुरू होता. माझं चुकलं, मला माफ करा असे ती म्हणत राहिली. मात्र, नराधमांनी तिला बेदम मारहाण करणे सुरू ठेवलं. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांदेखत तिच्या प्रियकरालादेखील मारहाण केली जात होती. या टोळक्यातील काही जणांनी मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचे दिसून आले.
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, घटनेबद्दल संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. ही घटना केवळ कायद्याचा धाक संपल्याचे द्योतक नाही, तर सामाजिक सलोख्यालाही धक्का देणारी असल्याचे म्हटले जात आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 30, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : सोडा...आम्हाला जाऊ द्या! दुसऱ्या धर्मातल्या मुलांसोबत फिरताना दिसली, मुलीला टोळक्याने बेदम मारलं