पोलीसच बनला गुंड, भाच्याला मारण्यासाठी रचला खूनी खेळ, विहिरीत भयावह अवस्थेत मृतदेह, जळगावला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता झालेल्या आणि त्यानंतर पाच दिवसानी विहिरीत मृतदेह आढळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता झालेल्या आणि त्यानंतर पाच दिवसानी विहिरीत मृतदेह आढळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणाची गावातीलच त्याच्या सख्ख्या आत्याच्या पतीच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. दोन अल्पवयीन मुलांनी अमली पदार्थ गांजाचे सेवन करून संबंधित तरुणाला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन सह एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नेमकं प्रकरण काय?
यावल तालुक्यातील मोहराळा गावातील रहिवाशी असलेला साहिल शब्बीर तळवी (वय १९) हा तरुण १६ जून पासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कुठेच थांगपत्ता लाला नाही. यामुळे कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात मुलगा हरवण्याची तक्रार दिली होती. या दरम्यान २० जून रोजी त्याचा मृतदेह हो मोहराळा गावाकडून वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता.
advertisement
मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर मयत साहिलच्या कुटुंबीयांनी आणि नातलगांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या संशयातून त्यांनी गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी याच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या वाहनाची तोडफोड केली. घटनेच्या माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोलीस पथकासह गावात दाखल झाले होते. त्यांनी गावात शांतता प्रस्थापित करून चोख बंदोबस्त लावला. तसेच मृतदेह तेथून काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन साठी पाठवला.
advertisement
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले. त्यांची कसून चौकशी केली. यावेळी अल्पवयीन मुलांनी हत्येची कबुली दिली. निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी याच्या सांगण्यावरून साहिल तडवी याला गांजाचं सेवन करायला लावलं, यानंतर विहिरीत ढकलून दिलं. तसेच त्याचा मोबाईल एका विहिरीत टाकून दिला, अशी माहिती अल्पवयीन मुलांनी दिली. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर यावल पोलिसांनी समीर गफुर तडवी यांच्या फिर्यादीवरून अयुब तडवीसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
June 23, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पोलीसच बनला गुंड, भाच्याला मारण्यासाठी रचला खूनी खेळ, विहिरीत भयावह अवस्थेत मृतदेह, जळगावला हादरवणारी घटना!


