'अ परफेक्ट मर्डर' नाटकात प्रिया मराठेच्या जागी आता दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

Last Updated:
अभिनेत्री प्रिया मराठेच्या 'अ परफेक्ट मर्डर' या प्रसिद्ध नाटकात आता तिच्या जागी एक प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे. तिला फर्स्ट लुक समोर आलाय.
1/8
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हळहळली. तिच्या जाण्यानं प्रेक्षकांसहीत कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियाने कॅन्सरवर मात केली होती.

advertisement
2/8
ट्रिटमेन्टच्या काळातही मालिका आणि नाटकांत काम करत होती. पल्लेदार वाक्य आणि सलग 3 तास उभं राहून ती नाटकांत काम करत होती. 'अ परफेक्ट मर्डर' हे तिचं एक त्यापैकीच एक गाजलेलं व्यावसायिक नाटक होतं.

3/8
मराठीतील काही थ्रिलर, मर्डर मिस्ट्री नाटकांपैकी हे एक नाटक आहे. प्रिया मराठेच्या निधनानंतर आता या नाटकात मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे.

4/8
अनेक मराठी मालिका, चित्रपट तसंच निवेदिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे दिप्ती भागवत आता 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकात दिसणार आहे.

5/8
या नाटकात ती मीरा ही भूमिका साकारणार आहे. या आधीही ही भूमिका दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेनं साकारली होती.

6/8
'अ परफेक्ट मर्डर' हे नाटक सुप्रसिद्ध चित्रपटकार सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित आहे. लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्याला मराठी रंगभूमीचा साज चढवला आहे. मूळ कथेचा आत्मा कायम ठेवून, मराठी संवेदनांना साजेसं रूपांतर करण्यात आलं आहे.

7/8
मीरा ही एक बहुरंगी व्यक्तिरेखा आहे. श्रीमंती, सौंदर्य आणि आत्मविश्वासाने झगमगणारी, पण अंतर्मनात असंख्य प्रश्न आणि भावनांच्या वादळांनी ढवळलेली आहे. ती दोषी आहे की बळी हे समजून घेणंही नाटकाचा भाग आहे, असं दिप्तीनं सांगितलं.

8/8
या नाटकात अभिनेता अनिकेत विश्वासराव, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रॉयल ऑपेरा हाऊसला 'अ परफेक्ट मर्डर'चा 6वा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement