मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांचा अत्याचार, 5 तास डांबून तोडले लचके, नराधमांचं एन्काऊंटर

Last Updated:

मित्रासोबत फिरायला गेलेल्या कॉलेजच्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

News18
News18
एका कॉलेजच्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी आपल्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती. ती विमानतळ परिसरात असताना तीन नराधमांनी त्यांचा पाठलाग केला. हल्लेखोरांनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण करत बेशुद्ध पाडलं. यानंतर नराधमांनी पीडितेला कारमधून ओढून नेत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवत आरोपींची ओळख पटवली आणि त्यांचं एन्काऊंटर केलं आहे. तिघांच्या पायाला गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थावसी, कार्तिक आणि कालीस्वरन अशी नराधम आरोपींची नावं आहेत. तिघांनी रविवारी रात्री उशिरा तरुणीवर अत्याचार केला होता. मंगळवारी पहाटे त्यांना पोलीस पकडायला गेले असता, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत तिन्ही आरोपी जखमी झाले.
advertisement
ही घटना तामिळनाडूतील कोइम्बतूर विमानतळावर घडली आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी आपल्या एका मित्रासह फिरायला गेली होती. यावेळी तिन्ही आरोपींनी चोरीच्या दुचाकीवरून येत दगडाने कारवर हल्ला केला. यानंतर त्यांनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण केली. मित्र बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनी तरुणीला ओढत आडबाजुला नेलं. तिथे तिघांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी तब्बल पाच तास डांबून तिचे लचके तोडले. यानंतर पहाटे सर्व आरोपी फरार झाले.
advertisement
या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर, पोलिसांनी तपासासाठी सात विशेष पथके तयार केली. पीडितेचे अपहरण झालेल्या ठिकाणापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींची ओळख पटवली. यावेळी तिन्ही आरोपी उपनगरातील कोइम्बतूरच्या वेल्लैकानार भागात लपले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींना अटक करण्यासाठी पोहोचले असता त्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यामध्ये कॉन्स्टेबल चंद्रशेखर जखमी झाला.
advertisement
यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, तिन्ही आरोपींना पायात मारले आणि त्यांना ताबडतोब अटक केली. तिन्ही आरोपींना पहाटे ३:०० वाजता कोइम्बतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांचा अत्याचार, 5 तास डांबून तोडले लचके, नराधमांचं एन्काऊंटर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement