Mumbai Crime: आठवीच्या मुलांच भयंकर कृत्य! शौचालयात जाऊन नको ते केलं, मुंबई हादरली

Last Updated:

Mumbai 8th School Student News: मुंबईतील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: आठवीच्या मुलांच भयंकर कृत्य! शौचालयात जाऊन नको ते केलं, मुंबई हादरली
Mumbai Crime: आठवीच्या मुलांच भयंकर कृत्य! शौचालयात जाऊन नको ते केलं, मुंबई हादरली
मुंबईतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक कृत्य समोर आले आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलासोबत अश्लील वर्तन करत होता. सुरुवातीला शाळेच्या परिसरात सुरू असलेला हा प्रकार पुढे अधिक गंभीर वळणावर गेला. आरोपीने पीडित मुलाला त्याच्या घराजवळील एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलगा मानसिकदृष्ट्या हादरून गेला होता.
advertisement
धक्कादायक गोष्ट म्हणजे, पोलिस तपासात याआधीही अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपीने पीडित मुलाला मारहाण करून शाळेच्या बाथरूममध्ये नेले आणि तिथे त्याच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मात्र भीतीमुळे आणि धाकामुळे पीडित मुलाने ही घटना कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती.
पण आता त्याने धीर दाखवत आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने लगेचच स्थानिक पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ त्या अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवत, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे.
advertisement
सध्या पोलीस शाळेतील अधिकारी, शिक्षक आणि पालकांची चौकशी करत असून, घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे संबंधित शाळेत भीतीचे वातावरण पसरले असून, पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai Crime: आठवीच्या मुलांच भयंकर कृत्य! शौचालयात जाऊन नको ते केलं, मुंबई हादरली
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement