महाराष्ट्राच्या व्यक्तीचा नेपाळच्या मंदिरात संशयास्पद मृतदेह
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indian National Found Dead in Nepal : नेपाळच्या बारा जिल्ह्यातील चुरियामाई मंदिरात एका भारतीय नागरिकाचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे.
काठमांडू: नेपाळच्या बारा जिल्ह्यातील चुरियामाई मंदिरात एका भारतीय नागरिकाचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. एका मंदिरात अशाप्रकारे भारतीय नागरिकाचा मृतदेह आढळल्याने मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरात भारतीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
स्थानिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना गुरुवारी 24 जानेवारी रोजी उघडकीस आली. नेपाळच्या बारा जिल्ह्यातील चुरियामाई मंदिराजवळील सार्वजनिक प्रतीक्षालयात एका भारतीय नागरिकाचा संशयास्पद मृतदेह आढळला. ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला, ते सार्वजनिक प्रतीक्षालय मंदिरापासून काही अंतरावर असणारे एका टेकडीवर आहे.
मृत आढळलेल्या ४२ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव रुद्र गिरी असून तो मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. गुरुवारी सिमरा उपमहानगर शहरातील मंदिर परिसरात तो मृतावस्थेत आढळला आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
रुद्र गिरी यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस गिरीच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिस्थितीचा सखोल तपास सुरू केला आहे. रुद्र गिरी हे नेपाळमध्ये नेमके कधी गेले, कशासाठी गेले? याची माहितीही अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
January 25, 2025 1:02 PM IST


