Crime News: भाताचा कुकर रिकामा केला अन् 3 वेळा डोक्यावर आपटला; तरुणाकडून लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
महिलेला मारण्यासाठी त्याने आधी भाताने भरलेला कुकर रिकामा केला. त्यानंतर दुपारी 4 ते साडेचारच्या दरम्यान महिलेच्या डोक्यावर कुकरने वार केले.
बंगळुरू 28 ऑगस्ट : देशात लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येची प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. आता पुन्हा एकदा लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.. ही घटना बंगळुरूची आहे. यात शनिवारी एका व्यक्तीने प्रेयसीची कुकरने वार करून हत्या केली. प्रेयसीची इतर पुरुषासोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, 24 वर्षीय पीडित देवा एस केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी होती, तर आरोपी वैष्णव हा कोल्लमचा आहे. प्रेयसीने आपली फसवणूक केल्याचा संशय वैष्णवला होता, असं पोलिसांनी सांगितलं. तरुणीचं दुसरीकडे कोणासोबत तरी अफेअर आहे, या संशयामुळे शनिवारीही दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की वैष्णवने प्रेयसीला मारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
महिलेला मारण्यासाठी त्याने आधी भाताने भरलेला कुकर रिकामा केला. त्यानंतर दुपारी 4 ते साडेचारच्या दरम्यान महिलेच्या डोक्यावर कुकरने वार केले. आरोपीनी तिच्या डोक्यावर एकदा नव्हे तर तीनदा कुकरने वार केले, त्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
तरुणीच्या मृत्यूची घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा तरुणीची बहीण कृष्णाने तिच्या मोबाईलवर कॉल केला. फोन उचलला न गेल्याने तिने शेजाऱ्यांना विनंती करून पीडित देवाला हिला भेटण्यास सांगितलं. शेजारचं एक जोडपं सकाळी तरुणीला भेटण्यासाठी गेलं. त्यांनी सांगितलं, की देवा आणि वैष्णव भांडण करत होते. कृष्णाने सांगितलं की, वैष्णव म्हणाला की देवा नेहमी फोनवर असते. ती कोणाला तरी मेसेज करते. यावर या जोडप्याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
अटकेनंतर वैष्णवने गुन्ह्याची कबुली दिल्याचे बेगूर पोलिसांनी सांगितले. अनेक वेळा सांगूनही देवा सतत कोणाच्या तरी संपर्कात होती, असा दावा आरोपीने केला आहे. मी वैष्णव आणि देवाची भेट केरळमधील कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. ते प्रेमात पडले होते आणि गेल्या तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. हे दोघेही शेअर मार्केट ट्रेडिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात घरून काम करत होते. दोघेही दीड वर्षांपूर्वी बंगळुरूला आले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2023 1:39 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: भाताचा कुकर रिकामा केला अन् 3 वेळा डोक्यावर आपटला; तरुणाकडून लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या