Nagpur Crime: नागपुरात दिवसाढवळ्या शाळकरी मुलीची हत्या, घरी परतताना हल्ला; आरोपी फरार
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nagpur Crime: शाळेतून घरी जात असताना मुलीवर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर : नागपुरातील एका शाळकरी मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतून घरी जात असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या झाली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे.
शाळेतून घरी जात असताना मुलीवर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनं नागपूर शहर हादरलं असून शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हत्या झालेली विद्यार्थीनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे.
हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी घटनास्थळीच तिचा मृत्यू
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली. त्यानंतर कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने मुलीवर चाकूने सपासप वार केले, ज्यामध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
आरोपीला पोलिसांनी केली अटक
या घटनामध्ये मृतक अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मुलाग हे दोघेही एकामेकावर प्रेम करत होते. त्यांच्यात काही कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता. यांचा वादातून आरोपी मुलाने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात अंजनी पोलिस पुढं तपास करत आहेत.
advertisement
कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर बाब
दरम्यान अल्पवयीन मुलीची अशाप्रकारे निर्घृण हत्या झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे. "दुपारी शाळेतून घरी येणाऱ्या मुलीवर अशा पद्धतीने हल्ला होणे हे शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
अजनी पोलीस ठाण्याचे अधिकारी सांगतात की, "हत्या करणाऱ्याचा शोध वेगाने सुरू असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल." सध्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Aug 30, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur Crime: नागपुरात दिवसाढवळ्या शाळकरी मुलीची हत्या, घरी परतताना हल्ला; आरोपी फरार










