नागपूरच्या अजब चोराची गजब कहाणी, फक्त बार आणि वाईन शॉपमध्ये मारतो डल्ला
- Published by:Prachi Amale
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
नागपुरच्या बारमध्ये रोख रक्कम 36 हजार रुपये आणि सिगारेटची पाकिटे असा 40 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
नागपूर: दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत. गाव खेड्यात तर दारूच्या अतिसेवनाने कौटुंबिक हिंसाचार, कलह आणि आत्महत्या यासारख्या अनेक घटना घडतात. घरातील या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर देखील परिणाम होतो. याचीच प्रचिती देणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. दारूच्या व्यसनाने वडिलांच मृत्यू झाल्याच्या संतापातून मुलगा चोर बनला आहे. राजा खान उर्फ राजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षापूर्वी दारूच्या अधिक सेवनाने आरोपीच्या वडिलाचा मृत्यू झाला, त्यामुळे बारचालक आणि वाईन शॉप चालकांविरोधात त्याच्या मनात संताप होता. त्यामुळेच त्यांनी चोरी करण्याचे ठरवले आणि शहरातील 8 दुकानात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र चोरीच्या पैशातून तो गांजाची नशा करत असल्याची बाब पोलिस चौकशीतून समोर आली आहे.
advertisement
सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक
31 जुलै रोजी त्याने राणी दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बारमध्ये अशीच चोरी केली. तेथून रोख रक्कम 36 हजार रुपये आणि सिगारेटची पाकिटे असा 40 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपी राजाला अटक केली आहे. त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे..
advertisement
पुण्यात मौजमजेसाठी चोरी करणारा अटक
स्वतःच्या मौज मजेसाठी गाड्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पुण्यातील नाना पेठ परिसरात आरोपी अनेकदा गाड्यांची चोरी करायचा. सुजल जितेश जगताप असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलाची मदत घेत आरोपी नाना पेठ परिसरात गाड्यांची चोरी करायचा. चार यमाह RX 100 आणि एक होंडा कंपनीची दुचाकी गेल्या सहा महिन्यात आरोपीकडून चोरी करण्यात आल्या होत्या
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 07, 2025 4:40 PM IST


