"आधी तिने, मग त्याने!", वाशिष्ठी नदीत नवदाम्पत्याने घेतली उडी, किरकोळ वादातून घडला प्रकार!

Last Updated:

चिपळूणमध्ये बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. धुळे जिल्ह्यातील साकरी गावचे रहिवासी असलेले नीलेश रामदास अहिरे (वय-26) आणि त्यांची पत्नी अश्विनी नीलेश अहिरे (वय-19) या नवदाम्पत्याने...

Chiplun News
Chiplun News
चिपळूण : केवळ तीन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका नवदाम्पत्याने, एका किरकोळ वादातून थेट गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेले हे दाम्पत्य नेमके कोणत्या कारणाने इतके टोकाचे पाऊल उचलले, याबद्दल शहरात हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना बुधवारी (दि. 30) सकाळी अंदाजे 10.30 वाजता घडली.
अशी घडली धक्कादायक घटना
नीलेश रामदास अहिरे (वय-26) आणि त्यांची पत्नी अश्विनी नीलेश अहिरे (वय-19) हे दोघे, जे सध्या चिपळूणच्या पागनाका येथे राहत होते, मूळचे धुळे जिल्ह्यातील साकरी गावचे रहिवासी होते. त्या सकाळी ते दोघे आपल्या मोटारसायकलवरून गांधारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना, चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांच्यात अचानक वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, त्यांनी रेल्वे स्टेशनकडे न जाता, परत गांधारेश्वर पुलावर येण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पहिल्यांदा बायको उडी घेतली, त्यानंतर पतीने...
पुलावर आल्यावर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात अश्विनीने कोणताही विचार न करता वाशिष्ठी नदीच्या पात्रात उडी घेतली. हे पाहून नीलेशनेही क्षणाचाही विलंब न लावता त्याच ठिकाणी नदीत उडी मारली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाहणाऱ्या लोकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत नीलेश आणि अश्विनी दोघेही पाण्यात बुडून दिसेनासे झाले होते. त्यांना वाचवण्याचा कोणालाही प्रयत्न करता आला नाही. तात्काळ या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली.
advertisement
नुकतंच लग्न झालं होतं आणि...
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. एनडीआरएफच्या पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी गांधारेश्वर मंदिराच्या जवळून वाशिष्ठी नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते, परंतु दुर्दैवाने दोघांपैकी कोणीही सापडले नव्हते. धुळे जिल्ह्यातील साकरी येथील नीलेश आणि अश्विनी यांचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात झाला होता. त्यांचे हे टोकाचे पाऊल अनेकांना कोड्यात पाडणारे ठरले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
"आधी तिने, मग त्याने!", वाशिष्ठी नदीत नवदाम्पत्याने घेतली उडी, किरकोळ वादातून घडला प्रकार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement