Pune Rave Party : मोठी बातमी! पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
Pune Rave Party : एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत हायप्रोफाइल मंडळी अडकले आहेत.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे: पुण्याच्या खराडी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत हायप्रोफाइल मंडळी अडकले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी रात्री उशिरा छापेमारी केली. यावेळी तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, मद्य आणि हुक्काचं सेवन केल्याचं पोलीस छापेमारीत समोर आलं.
advertisement
हा सगळा प्रकार खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू होता. हाउस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिलांसह 7 जणांचा समावेश होता. अटक केलेल्या आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. प्रांजल यांनी अमली पदार्थाचे सेवन केले होते की नाही, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या रेव्ह पार्टीत त्यांची कोणती भूमिका होती, हे देखील समोर आले नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 27, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Pune Rave Party : मोठी बातमी! पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ