रात्रीची वेळ, दोन तरुणी अचानक रस्त्यावर आडव्या आल्या अन्..., नाशकात ट्रकचालकासोबत घडलं भयंकर

Last Updated:

Crime in Nashik: नाशिकमध्ये ट्रकचालकांना लुटणारी एक अजब टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीतील दोन मुख्य आरोपी तरुणी असून, त्या मुलांचा वेश धारण करून लूटमार करत होत्या.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकमध्ये ट्रकचालकांना लुटणारी एक अजब टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीतील दोन मुख्य आरोपी तरुणी असून, त्या मुलांचा वेश धारण करून लूटमार करत होत्या. संबंधित तरुणींनी आतापर्यंत ३० हून अधिक ट्रकचालकांना लुटल्याची कबुली आरोपी तरुणींनी दिली आहे. ट्रकचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी सापळा रचून या तरुणींना पकडले, मात्र त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

रामेश्वर वर्मा नावाचे ट्रकचालक त्यांच्या गाडीतून जात असताना दोन तरुणी अचानक रस्त्यावर आडव्या आल्या अन् त्यांची गाडी अडवली. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ८ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या वर्मा यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला (११२) फोन करून मदतीची मागणी केली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना दोन तरुण संशयितरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते तरुण नसून तरुणी असल्याचे उघड झाले.
advertisement

३० हून अधिक ट्रकचालकांना लुटलं

पोलिसांनी या दोन्ही तरुणींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. मागील सहा महिन्यांत त्यांनी ३० हून अधिक ट्रकचालकांना लुटल्याचे त्यांनी सांगितले. या टोळीत एकूण पाच जण असून, त्यात दोन तरुणींसह तीन पुरुष साथीदारांचा समावेश आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार निशांत सूर्यवंशी आणि प्रवीण सूर्यवंशी असल्याचेही उघड झाले आहे.
advertisement

फरार आरोपींचा शोध सुरू

दरम्यान, पोलीस चौकशी सुरू असतानाच या दोन्ही तरुणींचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलांचा वेश धारण करून तरुणींनी केलेल्या या लुटीच्या प्रकारामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
रात्रीची वेळ, दोन तरुणी अचानक रस्त्यावर आडव्या आल्या अन्..., नाशकात ट्रकचालकासोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement