15 कोटींची वॉचमनची खोली, मग फराह खानच्या घराची किंमत किती? राखी सावंतच्या प्रश्नावर डायरेक्टरचं भन्नाट उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Farah Khan House Price : फराहने जेव्हा आपल्या घराची किंमत सांगितली, तेव्हा तिच्या घरी आलेल्या राखी सावंतचे अक्षरशः होश उडाले.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे जोरदार चर्चेत आहे. या व्लॉग्समधून ती सेलिब्रिटींची आलिशान घरे दाखवते, पण स्वतः फराह खान किती आलिशान घरात राहते, याचा खुलासा नुकताच तिने केला आहे. फराहने जेव्हा आपल्या घराची किंमत सांगितली, तेव्हा तिच्या घरी आलेल्या राखी सावंतचे अक्षरशः होश उडाले.
फराह खानच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये राखी सावंत पाहुणी म्हणून आली होती. दुबईहून परतलेली राखी मुंबईत पुन्हा स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. राखी सावंत ऑटो रिक्षाने फराह खानच्या बिल्डिंगमध्ये पोहोचली. रिक्षातून उतरताच तिने बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला थेट विचारले, "या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटची किंमत किती आहे?"
फराह खानच्या घराची खरी किंमत काय?
गार्डने उत्तर दिले, "१५ कोटी रुपये!" हे ऐकून राखी सावंत लगेच निराश झाली आणि म्हणाली की, तिला तर १०० कोटींच्या बंगल्यात राहायचे आहे. राखी सावंत लिफ्टने फराहच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर थेट फराहला म्हणाली, "माझं घर तुमच्या घरापेक्षा मोठं आहे. तुमच्या घराची किंमत फक्त १५ कोटी आहे आणि माझं घर ५० कोटींचं आहे!" यावर फराह खानने दिलेले उत्तर ऐकून राखीला मोठा धक्का बसला.
advertisement
फराह हसून म्हणाली, "माझं घर १५ कोटींचं नाहीये! तू माझ्या घराची मार्केट व्हॅल्यू का कमी करत आहेस? अगं, ती १५ कोटींची तर आमच्या बिल्डिंगमधील 'वॉचमनची खोली' आहे!" जेव्हा राखीने फराहच्या घराची खरी किंमत विचारली, तेव्हा फराह म्हणाली, "मी किंमत सांगू शकत नाही, पण माझ्याकडे आणखी दोन मजले आहेत आणि एक स्विमिंग पूलही आहे!"
advertisement
राखी सावंत आणि फराह खानची कॉमेडी जुगलबंदी
फराहच्या लक्झरी लाइफस्टाइलचा हा खुलासा ऐकून राखी सावंत चकित झाली. ती लगेच म्हणाली, "आता कळलं! म्हणूनच मला बॉलिवूडमध्ये कामासाठी पैसे मिळत नाहीत. सगळे म्हणतात की, फराह खान सगळे पैसे घेऊन जाते!" यावर फराहने हसत उत्तर दिले, "काय मूर्खपणा आहे! मी तर सगळ्यांसाठी फुकट काम करते!"
advertisement
दरम्यान, फराह खानचा हा व्लॉग खूपच मजेशीर होता. यावेळी राखीने तिच्या अतरंगी स्टाइलने केवळ प्रेक्षकांनाच नाही, तर फराह खानलाही पोट धरून हसायला भाग पाडलं. फराह खानचा हा एपिसोड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
15 कोटींची वॉचमनची खोली, मग फराह खानच्या घराची किंमत किती? राखी सावंतच्या प्रश्नावर डायरेक्टरचं भन्नाट उत्तर


