15 वर्षांच वनडे करिअर संपलं, भर मैदानात खेळाडूने ढसाढसा रडत घेतली निवृत्ती, विराटच्या RCB संघाशी खास कनेक्शन

Last Updated:

एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यात या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या निवृत्तीनंतर खेळाडू रडत रडत मैदानाबाहेर आली आहे. त्यामुळे या खेळाडूचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

sophie devine retirement
sophie devine retirement
Sophie Devine retirement : एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यात या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या निवृत्तीनंतर खेळाडू रडत रडत मैदानाबाहेर आली आहे. त्यामुळे या खेळाडूचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या खेळाडूचे विराट कोहली खेळत असलेल्या आरसीबी संघाशी खास कनेक्शन देखील आहे.त्यामुळे ही खेळाडू नेमकी कोण आहे? हे जाणून घेऊयात.
ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून सोफी डिव्हाईन आहे. सोफी डिव्हाईन कर्णधार असलेला न्यूझीलंड संघ आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेतून आधीच बाहेर झाला होता. त्यात आज न्यूझीलंडचा स्पर्धेतला शेवटचा औपचारीक सामना होता. हा सामना जिंकून न्यूझीलंडला शेवट गोड करण्याची आणि आपल्या कर्णधाराला गोड निरोप देण्याची संधी होती. पण न्यूझीलंडची ही संधी हुकली आहे.कारण इंग्लंडने 8 विकेटसने त्यांच्यावर विजय मिळवला होता. दरम्यान हा सामना कसा पार पडलेला हे जाणून घेऊयात.
advertisement
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने तिच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.परंतू न्यूझीलंडच्या फलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही आणि संघ 38.2 षटकांत 168 धावांवर आटोपला.
advertisement
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 29.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठून 8 विकेटने हा सामना जिंकला होता. या सामन्यात अॅमी जोन्सने 86 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने हा सामना जिंकला होता.अॅमीसोबत टॅमी ब्यूमोंट 40 धावांची हेदर नाईटने 33 धावांची खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर इंग्लंडने सामना जिंकला आहे. या सामन्यात सोफी डिव्हाईनने नाईटचा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा बळी घेतला.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सूरूवात खराब झाली होती. न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लिमरने 57 बॉलमध्ये 43 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे न्युझीलंडचा डाव 168 वर ऑल आऊट झाला होता.
शेवटच्या सामन्यात ठरली अपयशी
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक आणि दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या सोफी डेव्हाईनने तिच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात संयम आणि उद्देशपूर्ण खेळाची सुरुवात केली, परंतु ती तिचा डाव टिकवू शकली नाही, 35 चेंडूत 23 धावांवर स्टंप झाली. अशा प्रकारे डिव्हाईनच्या 15 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा अंत झाला. ती पॅव्हेलियनमध्ये परतताना दोन्ही संघातील खेळाडूंनी तिला गार्ड ऑफ हॉनर दिला.या दरम्यान ती मैदानातून रडत रडत बाहेर येताना दिसली.
advertisement
आरसीबीशी कनेक्शन काय?
सोफी डिव्हाईनच आरसीबीशी खास कनेक्शन आहे. आयपीएलमध्ये सोफी डिव्हाईन रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू संघातून खेळताना दिसली आहे. आरसीबी कडून खेळताना वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये एकूण ४०२ धावा केल्या. यात २०२३ मध्ये २६६ धावा (८ सामने) आणि २०२४ मध्ये १३६ धावा (१० सामने) होत्या. तिने १८ सामन्यांत हा रेकॉर्ड केला असून, २०२५ सीझनसाठी ती ब्रेक घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
15 वर्षांच वनडे करिअर संपलं, भर मैदानात खेळाडूने ढसाढसा रडत घेतली निवृत्ती, विराटच्या RCB संघाशी खास कनेक्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement