Radhika Yadav Murder : पोरीच्या पैशांवर जगतोय! बापानं का केली टेनिसपटू राधिकाची हत्या? प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

Last Updated:

Radhika Yadav Murder Case : प्रसिद्ध युवा टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी राहत्या घरी तीन गोळ्या मारून हत्या केली. या प्रकरणात आता एफआयआर नोंदवल्यानंतर धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Radhika Yadav Murder Case Update
Radhika Yadav Murder Case Update
Radhika Yadav Murder Case Update : गुरुग्रामच्या सेक्टर- 57 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. 25 वर्षीय माजी राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची (Radhika Yadav Murder) तिच्याच वडिलांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना अटक केली. राधिकाच्या काकांच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे आणि हत्येत वापरलेले परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आलंय. पण राधिका यादवची हत्या का झाली? नेमकं कारण काय होतं? याचा खुलासा झाला आहे.

FIR मधून हत्येचं कारण उघड 

गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्येचं कारण आता एफआयआरमध्ये उघड झालं आहे. राधिका यादवच्या वडिलांनी हत्येची कबुली दिली आहे. त्यावेळी त्यांनी हत्येचं कारण देखील सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुरुग्राम पोलीसांच्या चौकशीदरम्यान वडील दीपक यादव यांनी मान्य केलं आहे की, त्यांना मुलगी राधिकाने नुकतीच सुरू केलेली टेनिस अकादमी आवडत नव्हती. अनेकदा राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितलं होतं, मात्र राधिकाने त्यांचं काहीही एक ऐकलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनात राधिकाविषयी राग होता.
advertisement

गावात लोकं टोमणे मारायचे

दोन वर्षापूर्वी राधिकाच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला करियरमधून छोटा ब्रेक घ्यावा लागत होता. त्यामुळे तिने भन्नाट आयडिया काढली अन् अकादमी सुरू केली. जे तिच्या वडिलांना आवडत नव्हतं. त्यात गावात लोकं टोमणे मारायचे. मुलीच्या कमाईवर जगत असल्याची सतत टीका होत असल्याने दीपक यादव यांना संताप अनावर झाला. अखेर गुरूवारी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी, जेव्हा राधिका किचनमध्ये काम करत होती, तेव्हा आपल्या रिव्हॉव्हरमधून गोळ्या झाडल्या.
advertisement
advertisement

किचनमध्ये राधिका रक्ताच्या थारोळ्यात

घटना घडली तेव्हा, घरात फक्त दीपक यादव, राधिकाची आई मंजू यादव आणि राधिका तिघंच होते. राधिकाचा सख्खा भाऊ घराबाहेर होता. गोळीबाराचा आवाज ऐकताच दीपक यादव यांचा भाऊ आणि पुतण्या तातडीने घरात पोहोचले अन् राधिकाला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी किचनमध्ये राधिका रक्ताच्या थारोळ्यात सापडली आणि मेजवर हत्येसाठी वापरलेली रिव्हॉल्व्हर ठेवलेली होती. त्यानंतर पोलिसांना घटनेबद्दल कळवण्यात आलं.
advertisement

समाजाच्या दबावामुळे पोटच्या पोरीला मारलं

दरम्यान, सध्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. समाजाच्या दबावामुळे पोटच्या पोरीला मारणाऱ्या दीपक यादव यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जातीये. तर समाज म्हणून आपण देखील किती परिपक्व आहोत, याची समज देखील असायला हवी, असं मत देखील नेटकरी व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Radhika Yadav Murder : पोरीच्या पैशांवर जगतोय! बापानं का केली टेनिसपटू राधिकाची हत्या? प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement