Ratnagiri Crime News : भाऊबंदकीचं नातं रक्ताने माखलं, थोरल्या भावाने धाकट्याला वार करत संपवलं, दापोली हादरलं!
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Shivaji Gore
Last Updated:
Ratnagiri News : एका मोठ्या भावाने थेट आपल्या लहान भावाचा कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करत हत्या केली. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.
दापोली: एका लहानशा वादातून सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. थोरल्या भावाने धाकट्या भावाला वादाच्या रागातून संपवल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उन्हवरे गावात शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. एका मोठ्या भावाने थेट आपल्या लहान भावाचा कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करत हत्या झाल्याने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. या कुटुंबातील दोन भावांचा वाद इतका चिघळला की त्याचा शेवट एकाची हत्या आणि दुसऱ्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. तर, आपल्या डोळ्यादेखत कुटुंब उद्धवस्त झाल्याचे दिसल्याने वृद्ध आईसमोर थरथरता हात कपाळाला लावण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचं नाव विनोद गणपत तांबे (वय 36) असून, आरोपी रवींद्र तांबे हा त्याचा मोठा भाऊ आहे. शनिवारी मध्यरात्री दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाली. या झटापटीदरम्यान रवींद्रने कुऱ्हाडीने विनोदवर हल्ला करत त्याची जागीच हत्या केली. या दोघांमध्ये कुटुंबातील मालमत्तेवरून वाद सुरू होता. या दोघांमधील वाद शनिवारी मध्यरात्री चांगलाच चिघळला.
advertisement
पोलिसांची तात्काळ कारवाई, फॉरेन्सिक टीम दाखल
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विनोदचा मृतदेह ताब्यात घेऊन दापोली ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र तांबे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट देत पुरावे गोळा केले. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
गावात भीती आणि हळहळचं वातावरण
एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये असा जीवघेणा वाद होऊन खून होण्याची घटना गावकऱ्यांना हादरवून गेली आहे. या संपूर्ण उन्हवरे गावात सध्या भय आणि हळहळीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
July 20, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Ratnagiri Crime News : भाऊबंदकीचं नातं रक्ताने माखलं, थोरल्या भावाने धाकट्याला वार करत संपवलं, दापोली हादरलं!