Sangli News : समलिंगी संबंधाला विरोध, दोन अल्पवयीन मुलांनी तरुणालाच संपवलं, मिरजेतील धक्कादायक घटना

Last Updated:

Sangli Crime News : मिरज तालुक्यातील आरग गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने समलिंगी संबंधाला विरोध केल्याने त्याची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केली असल्याचा घटना घडली आहे.

समलिंगी संबंधाला विरोध, दोन अल्पवयीन मुलांनी तरुणालाच संपवलं, मिरजेतील धक्कादायक घटना
समलिंगी संबंधाला विरोध, दोन अल्पवयीन मुलांनी तरुणालाच संपवलं, मिरजेतील धक्कादायक घटना
सांगली: मिरज तालुक्यातील आरग गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने समलिंगी संबंधाला विरोध केल्याने त्याची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केली असल्याचा घटना घडली आहे. सुजल बाजीराव पाटील (वय 21, रा. आरग) या तरुणाचा मृतदेह आरग तलावात आढळून आला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
28 जून रोजी सुजल पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मामाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. सुजल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र एका लग्नपूर्व हळदी समारंभासाठी बेळंकी येथे गेले होते. त्यानंतर सुजल घरी परतला नाही. काळजीत असलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. सुजलच्या गायब होण्यावर संशय वाढल्याने पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरु केला.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी सुजलचे दोन अल्पवयीन मित्र ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कबुली दिली की, त्यांनीच सुजलचा तलावात बुडवून खून केला. तिघांनी एकत्रितपणे मध्यपान केल्यानंतर आरग तलावाजवळ थांबले. यावेळी त्या दोघांपैकी एकाने सुजलसोबत समलिंगी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुजलने त्यास तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे वाद निर्माण झाला.
वादाच्या परिणामी, दोघांनी मिळून सुजलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला जबरदस्तीने तलावात ढकलून बुडवून ठार मारले. हे करून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते.
advertisement
आरोपींच्या कबुलीजबाबानंतर, पोलिसांनी तातडीने तलावात शोधमोहीम राबवून सुजलचा मृतदेह हस्तगत केला. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना बालन्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कल्याणी बोरवरकर, उपविभागीय अधिकारी प्रनील गिल्डा आणि पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या घटनेमुळे आरग परिसरात मोठी खळबळ उडाली असून, समलिंगी संबंधांवरून घडलेल्या या हत्येने समाजमन हादरले आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Sangli News : समलिंगी संबंधाला विरोध, दोन अल्पवयीन मुलांनी तरुणालाच संपवलं, मिरजेतील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement