26/11 हल्ल्याचे खतरनाक कनेक्शन उघड; तहव्वुर राणाला होता विकृत शौक, 'मिस्ट्री गर्ल' सोबत मुंबईची केली रेकी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Attack Tahawwur Rana News: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याच्या NIA चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याच्यासोबत भारतात वावरलेली एक 'मिस्ट्री गर्ल' तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. ही बुरखाधारी महिला मुंबई हल्ल्याच्या कटातील महत्त्वाची कडी असल्याचा संशय NIA ला आहे. तर दुसरीकडे राणाच्या लष्करी गणवेशाच्या वेडानेही तपास यंत्रणा चक्रावल्या आहेत.
नवी दिल्ली: मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी-कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर राणा याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुख्यालयात कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांचे लक्ष आता एका 'मिस्ट्री गर्ल'वर म्हणजेच रहस्यमय महिलेवर केंद्रित झाले आहे. ही महिला भारतात तहव्वुर राणासोबत सावलीसारखी फिरताना दिसली होती.
कोण आहे 'मिस्ट्री गर्ल'?
एनआयए आता उत्तर प्रदेशातील आग्रा आणि हापूर तसेच दिल्लीतील एका ठिकाणी तहव्वुर राणासोबत दिसलेल्या या रहस्यमय महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. तहव्वुर राणा जेव्हा या शहरांमध्ये गेला होता. तेव्हा त्याने या महिलेला आपली 'बेगम' म्हणजेच पत्नी असल्याचे सांगितले होते. मात्र एनआयएला शंका आहे की ती खरोखरच त्याची पत्नी होती की कोणी महिला दहशतवादी? बुरखा घालणारी ही महिला सध्या कुठे आहे? हे जाणून घेणे तपास यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई हल्ल्यापूर्वी तहव्वुर राणा या महिलेसोबत या भागांमध्ये थांबला होता आणि त्याने अनेक ठिकाणांची टेहळणी (रेकी) केली होती. एनआयएच्या कागदपत्रांनुसार तहव्वुर राणा 13 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान भारतात आला होता. म्हणजेच मुंबई हल्ल्याच्या अगदी काही दिवस आधी. तपास यंत्रणा येत्या काळात राणा याला या ठिकाणांची ओळख पटवण्यासाठी घेऊन जाण्याची शक्यता आहे.
advertisement
राणाला लष्करी गणवेशाचे प्रचंड वेड!
चौकशीदरम्यान राणाने आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दलही काही माहिती दिली आहे. दहशतवादी कारवायांच्या प्रश्नांपूर्वी त्याच्याकडून वैयक्तिक माहिती घेण्यात आली. यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे राणाला लष्करी गणवेशाचे (Army Dress) प्रचंड वेड ('इश्क') आहे. त्याने चौकशीत सांगितले की, त्याला लष्करी गणवेशाबद्दल विशेष आकर्षण आहे. त्याचा एक भाऊ पत्रकार असल्याचेही त्याने सांगितले.
advertisement
राणा अनेकदा दहशतवादी कारवायांसंबंधित बैठकांमध्ये सहभागी होताना लष्करी गणवेश परिधान करत असे. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशाचा त्याला इतका शौक होता की, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही तो अनेकदा गणवेश किंवा फौजी कपडे घालूनच साजिद मीर आणि मेजर इक्बाल (पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय अधिकारी) सारख्या लोकांना भेटायला जात असे. त्याने लष्कर-ए-तोयबा आणि हरकत-उल-जिहाद-इस्लामीच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांनाही पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांसोबत गणवेश घालूनच भेटी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे.
advertisement
तहव्वुर राणाची पार्श्वभूमी
तहव्वुर हुसैन राणा हा मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचबुतनी गावचा आहे. त्याचे वडील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. त्याच्या दोन भावांपैकी एक लष्करात मानसोपचारतज्ज्ञ आहे. तर दुसरा पत्रकार. राणाने कॅडेट कॉलेज हसन अब्दाल येथून शिक्षण घेतले. जिथे त्याची भेट डेव्हिड हेडली या दुसऱ्या दहशतवाद्याशी झाली.
1997 मध्ये तो आपल्या डॉक्टर पत्नीसह कॅनडाला स्थायिक झाला आणि तिथे त्याने इमिग्रेशन सर्व्हिस (स्थलांतर सेवा) आणि हलाल मीटचा व्यवसाय सुरू केला. त्याची भारतविरोधी मानसिकता आणि दहशतवादी संघटनांशी असलेली जवळीक त्याला एक धोकादायक कटकारस्थान करणारा म्हणून समोर आणते. एनआयएच्या चौकशीतून मुंबई हल्ल्याच्या कटाचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
26/11 हल्ल्याचे खतरनाक कनेक्शन उघड; तहव्वुर राणाला होता विकृत शौक, 'मिस्ट्री गर्ल' सोबत मुंबईची केली रेकी