New Orleans Attack : नरसंहारावर उतरला ड्रायव्हर; पोलिसांवरही झाडल्या गोळ्या, अमेरिका दहशतवादी हल्ल्याने हादरली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमेरिकेच्या न्यू ऑरलियन्समध्ये बुधवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. भरधाव येणाऱ्या कारने नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांना चिरडलं, ज्यात 12 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
न्यू ऑरलियन्स : अमेरिकेच्या न्यू ऑरलियन्समध्ये बुधवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. भरधाव येणाऱ्या कारने नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांना चिरडलं, ज्यात 12 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीला कंठस्नान घातलं आहे. न्यू ऑरलियन्स पोलिसांनी जे खुलासे केले आहेत ते धक्कादायक आहेत. पोलिसांनी सांगितलं की कारचा ड्रायव्हर नरसंहारावर उतरला होता, त्याने दोन पोलिसांना गोळीही मारली आहे. गर्दीच्या जवळ पोहोचताच हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. पहिले पोलिसांना संपवून नंतर जास्तीत जास्त हत्या करण्याच्या इराद्याने दहशतवादी आले होते.
अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयच्या विशेष अधिकारी अल्थिया डंकन यांनी या संपूर्ण हल्ल्याचा तपास सुरू झाला असल्याची माहिती दिली आहे. घटनास्थळावरून आम्हाला आयईडी मिळालं आहे, ज्यामुळे चिंता वाढली आहे. हल्लेखोर आयईडी स्वत:सोबत घेऊन आले होते का आयईडी तिकडेच पडून होतं? याचा तपास एफबीआय करत आहे. हल्ला झाला ते ठिकाण सुरक्षित झोन आहे, तसंच इकडे फुटबॉल स्टेडियमही आहे, जिकडे मॅच बघण्यासाठी हजारो लोक येतात. या भागात राहणाऱ्या लोकांनाही घरातच थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
advertisement
व्हिडिओमध्ये दिसला रोबोट
घटनास्थळी एकच आयईडी होता का एक पेक्षा जास्त? या प्रश्नावर अल्थिया डंकन यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. काही उपकरणं मिळाली आहेत, जी चिंता वाढवणारी आहेत, असं उत्तर अल्थिया डंकन यांनी दिलं. सीएनएनच्या डब्ल्यूडीएसयूच्या व्हिडिओमध्ये एक रोबोट कारच्या खाली जाताना दिसला आहे, पोलीस याचाही तपास करत आहेत.
काही वेळातच होती मॅच
view commentsअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. हा भाग न्यू ऑरलियन्सच्या फ्रेंच क्वार्टरमधील लोकप्रिय ठिकाण आहे. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बरेच लोक इकडे आले होते. काही वेळातच इथल्या शुगर बाऊल कॉलेज अमेरिकन फुटबॉल मॅच होणार होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. या कारणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
New Orleans Attack : नरसंहारावर उतरला ड्रायव्हर; पोलिसांवरही झाडल्या गोळ्या, अमेरिका दहशतवादी हल्ल्याने हादरली


