Try Not to Laugh : तो आला, खिडकीतून आत जाणार तोच... देवाच्या दर्शनाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरी चोर अडकला, Video पाहून म्हणाल, 'हा देवाचाच चमत्कार'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Thief Stuck in Wall Hole : ही घटना एका अशा कुटुंबाच्या घरी घडली जे घर बंद करून 'खाटू श्याम' यांच्या दर्शनासाठी गेले होते.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर चोरीच्या अनेक घटनांचे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो. कधी चोर शिताफीने चोरी करून पळून जातात, तर कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. पण सध्या एका अशा चोराची चर्चा रंगली आहे, ज्याची अवस्था पाहून तुम्हाला राग येण्याऐवजी हसूच येईल. चोरी करायला गेला खरा, पण नशिबाने अशी काही फिरकी घेतली की बिचारा चोर ना पळू शकला, ना चोरी करू शकला.
ही घटना एका अशा कुटुंबाच्या घरी घडली जे घर बंद करून 'खाटू श्याम' यांच्या दर्शनासाठी गेले होते. घर रिकामे असल्याचे पाहून एका चोराला वाटले की आज आपली चांदी होणार. त्याने घरात घुसण्यासाठी मुख्य दरवाजाऐवजी एका खिडकीच्या किंवा भिंतीच्या छोट्या छिद्राचा (होलचा) आधार घेण्याचे ठरवले. मात्र, देवाची भक्ती आणि चोराची शक्ती यात मोठा पेच निर्माण झाल्याचं इथे दिसतंय.
advertisement
चोराने मोठ्या उत्साहात त्या होलमध्ये डोकं आणि अर्ध शरीर तर घातलं, पण त्याचे शरीर मध्येच अडकून पडलं. त्याने बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्या छिद्रात असा काही फसला की त्याला हालचाल करणेही कठीण झाले. रडकुंडीला आलेला हा चोर तासनतास त्याच अवस्थेत लटकत राहिला.
मालक परतले आणि समोरचे दृश्य पाहून चक्रावले
जेव्हा घरातील लोक खाटू श्यामचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या भिंतीत काहीतरी विचित्र हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहतात तर काय, एक माणूस तिथे अडकून पाय झाडत होता. घरातील लोक घाबरण्याऐवजी हे अजब दृश्य पाहून अवाक झाले. चोराची फजिती पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.
advertisement
A theft did was foiled after the thief got stuck in the exhaust vent of the house he was trying to enter in Kota district of Rajasthan. Later, owner alerted cops who arrived and rescued him. pic.twitter.com/SQnpIrXP3s
— Piyush Rai (@Benarasiyaa) January 6, 2026
advertisement
या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. लोक यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. कोणी म्हणतंय, "खाटू श्यामची हीच ती माया", तर कोणी म्हणतंय, "चोरी करण्याआधी जिम लावायला हवी होती" अखेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या 'फसलेल्या' चोराला बाहेर काढलं आणि थेट कोठडीची हवा खायला पाठवले. ही घटना आपल्याला सांगते की, कधी कधी तुमचं नशीब आणि तुमचं शरीर दोन्ही तुमची साथ सोडतात, विशेषतः जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर असता.
advertisement
हा चोर तिथे कधीपासून लटकत होता हे काही कळू शकलेलं नाही आणि तो चोर देखील तोंड उघडायला तयार नाही, पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 7:20 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Try Not to Laugh : तो आला, खिडकीतून आत जाणार तोच... देवाच्या दर्शनाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरी चोर अडकला, Video पाहून म्हणाल, 'हा देवाचाच चमत्कार'











