तारेनं गळा आवळला, ड्रममध्ये टाकून पेटवलं, काकाने पुतण्याला दिली भयंकर शिक्षा, मुलीचे नको ते VIDEO काढल्याने...

Last Updated:

एका व्यक्तीने आपल्या पुतण्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी काकाने पुतण्याची तारेनं गळा आवळून हत्या केली.

News18
News18
एका व्यक्तीने आपल्या पुतण्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी काकाने पुतण्याची तारेनं गळा आवळून हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने एका निळ्या ड्रममध्ये पुतण्याचा मृतदेह कोंबून तो पेटवून दिला. मयत पुतण्याने आरोपीच्या मुलीचे आंघोळ करताना व्हिडीओ काढले होते. याच रागातून काकाने क्रूरतेचा कळस गाठत पुतण्याला भयावह शिक्षा दिली. मागील वर्षी घडलेल्या या हत्या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना १८ फेब्रुवारी २०२४ रोजी आग्रा येथील मालपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडली होती.

नेमकी घटना काय आहे?

या प्रकरणातील मुख्य आरोपी देवी राम (वय ३२) याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पुतण्या राकेश हा आरोपीच्या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होता. त्याने आरोपीच्या मुलीचे आंघोळ करत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर तो याच फोटो आणि व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करत होता. ही गोष्ट जेव्हा मुलीच्या वडिलांना (देवी राम) समजली, तेव्हा त्यांनी राकेशच्या हत्येचा कट रचला.
advertisement

अशी घडली हत्या

१८ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री देवी रामने राकेशला त्याच्या ग्वाल्हेर महामार्गावरील मिठाईच्या दुकानात बोलावले. राकेश तिथे पोहोचल्यानंतर देवी रामने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. त्याने मफलर आणि लोखंडी तारेने राकेशचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. त्यानंतर त्याने आपला पुतण्या आणि सह-आरोपी नित्य किशोर याला बोलावले. दोघांनी मिळून राकेशचा मृतदेह एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरला.
advertisement
त्यानंतर एका लोडरमध्ये ड्रम टाकून ते खारी नदीजवळील एका निर्जन भागात गेले. तिथे त्यांनी ड्रम खाली उतरवून त्यावर पेट्रोल ओतले आणि तो पेटवून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी राकेशचा मोबाईल, मफलर आणि लोखंडी तार खारी नदीत फेकून दिले. राकेशची दुचाकी मात्र त्यांनी महामार्गाच्या बाजूलाच ठेवली. त्यानंतर आरोपी देवी राम स्वतः मिठाईचे दुकान बंद करून दिल्लीला पळून गेला. आता अखेर१५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी आरोपी देवीरामला जगदीशपूर पुलाजवळ अटक केली. अटकेनंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.
मराठी बातम्या/क्राइम/
तारेनं गळा आवळला, ड्रममध्ये टाकून पेटवलं, काकाने पुतण्याला दिली भयंकर शिक्षा, मुलीचे नको ते VIDEO काढल्याने...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement