साताऱ्यात चाललंय काय? 2 मिनिटांत 3 चोरट्यांनी केला कांड, माॅर्निंग वाॅकवेळी महिलेसोबत घडली धक्कादायक घटना!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सौ. वंदना प्रशांत शिंगटे (वय-47, रा. फाॅरेस्ट काॅलनी, विलासपूर, सातारा) या काॅलनीत महिलांसोबत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या होत्या. माॅर्निंग वाॅक झाल्यानंतर...
सातारा : माॅर्निंग वाॅकला गेलेल्या महिलेला अडवून 3 चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार साताऱ्यात घडला. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजता फाॅरेस्ट काॅलनीमध्ये घडली. चोरट्यांना काही महिलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ढकलून चोरटे गाडीवरून पसार झाले.
अशी घडली घटना...
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सौ. वंदना प्रशांत शिंगटे (वय-47, रा. फाॅरेस्ट काॅलनी, विलासपूर, सातारा) या काॅलनीत महिलांसोबत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या होत्या. माॅर्निंग वाॅक झाल्यानंतर त्या घरी परतत होत्या. तेवढ्यात दुचाकीवरून 3 चोरटे तोंडाला स्कार्प बांधून आले आणि वंदना यांना थांबवलं. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून धमकावले आणि त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
advertisement
महिलांना प्रतिकार केला पण...
घटनेवेळी काही महिलांनी चोरट्यांना प्रतिक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण, चोरट्यांना हातातील धारदार शस्त्र दाखवून धमकावले आणि तेथून दुचाकीवर बसून पळून गेले. अवघ्या काही 2 मिनिटांत हा धक्कादायक प्रकार घटला. महिलांनी आरडाओरड केली. नागरिक जमा झाले. पण चोरट्यांनी नागरिक गोळा होण्याच्या आता धूम ठोकली. यासंदर्भात सातारा पोलीस ठाण्यात वंदना यांनी चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
हे ही वाचा : आशीर्वाद घेणं पडलं महागात! घाटात थांबवलं अन् साधूंनीच लुटलं; महिलांचे दागिने घेऊन 'ही' टोळी झाली फरार, पण...
हे ही वाचा : खून की आत्महत्या? भुवईवर जखम, गळ्यावर व्रण; 'त्या' तरुणाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांना तर वेगळाच संशय...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
साताऱ्यात चाललंय काय? 2 मिनिटांत 3 चोरट्यांनी केला कांड, माॅर्निंग वाॅकवेळी महिलेसोबत घडली धक्कादायक घटना!