खून की आत्महत्या? भुवईवर जखम, गळ्यावर व्रण; 'त्या' तरुणाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांना तर वेगळाच संशय...

Last Updated:

Sangli Crime : आरवडे येथे राहत्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. खून की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुटल चर्चा सुरू झाली आहे. कारण, त्याच्या...

Sangli Crime
Sangli Crime
तासगाव (सांगली) : आरवडे येथे राहत्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. खून की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुटल चर्चा सुरू झाली आहे. कारण, त्याच्या भुवईवर जखम होती आणि त्यातून रक्तस्त्रावही झाला होता. इतकंच नाहीतर त्याच्या गळ्यावर व्रण असल्याचेही दिसून आले.  यासंदर्भात पोलिसांनी हत्या झाल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त केलेला आहे. पण या तरूणाचा व्हिसेरा राखून ठेवला असल्यामुळे मृत्यूचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
संग्रामचा संशयास्पद मृत्यू
संग्राम राजाराम वाघ असे या तरुणाचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. आरवडे (ता. तासगाव) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संग्रामचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील (रा. वाघापूर) यांना सोमवारी सकाळी (दि. 25) संग्राम आपल्या खोलीत पालथा झोपल्याचे दिसून आले. त्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आशिष आणि संग्रामची आई यांनी संग्रामला उताणे केले असता, त्याच्या उजव्या भुवईवर जखम असल्याचे आणि गळ्यावर फास लावल्याचे व्रण असल्याचे दिसून आले.
advertisement
खून झाल्याचा पोलिसांचा संशय
संग्रामची परिस्थिती पाहून तातडीने डाॅक्टरांना बोलावून घेतले, तेव्हा डाॅक्टरांनी मृत असल्याचे सांगितले. तासगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली असता ते तातडीने दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी त्याच्या उजव्या भुवईवर जखम आणि गळ्याभोवती व्रण असल्याचे सांगितले. पण व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्रथमदर्शनी संग्रामचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
खून की आत्महत्या? भुवईवर जखम, गळ्यावर व्रण; 'त्या' तरुणाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांना तर वेगळाच संशय...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement