जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, चौकातील फ्रीस्टाईल राड्याचा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगाव शहरातील कांचनगर भागात एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील कांचनगर भागात एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सहा ते सात जणांच्या टोळीने तरुणाला लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण केली आहे. तरुणाला एका गेटमधून बाहेर ओढून आणत भरचौकात मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
दुर्गेश चंद्रकांत सपकाळे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कांचनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. घटनेच्या दिवशी दुर्गेश सपकाळे हा कांचन नगरातील उज्ज्वल चौकात उभा होता. यावेळी तिथे धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड आणि यांच्या सोबत असलेले इतर अनोळखी तरुणांनी दुर्गेशला शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरूवात केली. काहीही कळाच्या आत हा हल्ला झाल्याने दुर्गेश स्वत:चा बचाव करू शकला नाही.
advertisement
सर्वांनी लाथा बुक्क्यांनी दुर्गेशला मारहाण केली. यातील एकाने हातात लाकडी काठी घेवून मारहाण करत दमदाटी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शनीपेठ पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाणीसह जीवे मारण्याच्या प्रयत्न अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर आणि गायकवाड (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. इतर दोन अनोळखी आरोपींवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
जळगावात एका तरुणाला जुन्या वादातून बेदम मारहाण #jalgaon #CrimeNews pic.twitter.com/jJocF4KTmH
— News18Lokmat (@News18lokmat) February 17, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दुर्गेश आणि आरोपी यांच्यात जुना वाद आहे. याच वादातून त्यांच्यात अनेकदा खटके देखील उडाले आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी दुर्गेशला गाठून मारलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 17, 2025 2:10 PM IST










