नाना पाटेकरांनी माधुरीसाठी लिहिलेली 'ही' शायरी; व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले,'एवढं प्रेम तर...'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Nana Patekar on Madhuri Dixit : माधुरी दीक्षितसाठी एकदा नाना पाटेकर यांनी एक खास शायरी लिहिली होती. नानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nana Patekar on Madhuri Dixit : माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचे लाखो-कोटी चाहते आहेत. या चाहत्यांचं माधुरीवर प्रचंड प्रेम आहे. बॉलिवूडमध्येही तिचे चाहते कमी नाहीत. अभिनेते नाना पाटेकरदेखील माधुरीचे मोठे चाहते आहेत. एका टीव्ही शोमध्ये नाना पाटेकरांनी माधुरीसाठी एक शायरी लिहिली होती. तसेच त्यांनी चाहत्यांसोबत ही शायरी सादरदेखील केली. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
माधुरी दीक्षितवर प्रेम करत होते नाना पाटेकर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की नाना पाटेकर एका शायरीच्या माध्यमातून माधुरी दीक्षितविषयी आपले प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांनी म्हटले,"मी एकतर्फी माधुरी दीक्षितवर प्रेम करतो, अर्थात तिचं माझ्यासोबत कधीच प्रेम होऊ शकत नाही" एकदा मी माधुरीसाठी एक शायरी लिहिली होती, पण आजपर्यंत बोलू शकलो नाही. पण आज बोलत आहे.
advertisement
नाना पाटेकरांनी माधुरीसाठी लिहिलेली शायरी काय आहे?
कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो,
कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो
जीवन का संगीत हो,
तुम जिंदगी
तुम मंदगी
तुम रोशनी
तुम ताजगी
तुम हर खुशी
प्यार हो
प्रीत हो
मनमीत हो
आंखों में तुम
यादों में तुम
advertisement
नींदों में तुम
ख्वाबों में तुम हो
तुम हो मेरी हर बात में
तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबह में
तुम शाम में
तुम सोच में
तुम काम में
मेरे लिए पाना भी तुम
मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हंसना भी तुम
मेरे लिए रोना भी तुम
advertisement
और जागना- सोना भी तुम
जाऊं कहीं, देखूं कहीं
तुम हो वहां
तुम हो वहीं
कैसे बताऊं मैं तुम्हें
तुम बिन तो मैं कुछ भी नहीं.
advertisement
नाना पाटेकरांचा व्हिडीओ व्हायरल
view commentsनाना पाटेकरांच्या शायरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 39,073 पेक्षा जास्त लोकांनी पसंती दिली आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले,'ही शायरी ऐकून माधुरी दीक्षितला तुमच्यावर प्रेम होईल', दुसऱ्या युजरने लिहिले, 'आम्हाला माहीत नव्हते की नाना पाटेकर इतके रोमँटिक आहेत', तिसऱ्या युजरने मजा घेत लिहिले, '2-4 ओळी अजून सांगितल्या असत्या तर "माधुरी पुराण" म्हणून संकलन करू शकलो असतो'.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नाना पाटेकरांनी माधुरीसाठी लिहिलेली 'ही' शायरी; व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले,'एवढं प्रेम तर...'