सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या नित्या मेनन, मानसी पारेख आहेत तरी कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत दोन अभिनेत्री सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. कोण आहेत या अभिनेत्री?
मुंबई : 70 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ज्यात वाळवी या मराठी सिनेमानं तर गुलमोहर या हिंदी सिनेमानं सर्वात्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. तर कांतारा सिनेमासाठी अभिनेता ऋषभ शेट्टी सर्वोत्तम अभिनेता ठरला आहे. तर अभिनेत्री नित्या मेनन हिला तिच्या तिरुचित्रम्बलम या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तर अभिनेत्री मानसी पारेख हिनं कच्छ एक्सप्रेस या सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगिरीमध्ये या दोन अभिनेत्रींनी नाव कमावलं आहे.
अभिनेत्री नित्या मेनन हिला 2022 साली आलेल्या तिरुचित्रम्बलम या सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात अभिनेता धनुष तिच्याबरोबर प्रमुख भुमिकेत होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. नित्या ही अभिनेत्रीबरोबर उत्तम गायिका आहे. मल्याळम, तमिळू आणि तेलुगू सिनेमात ती प्रामुख्यानं काम करते. ती अक्षय कुमारच्या मिशन मंगल सिनेमातही दिसली होती.
advertisement
नित्याला ज्या सिनेमासाठी पुरस्कार देण्यात आला तो तिरुचित्रम्बलम हा सिनेमा फुल्ल रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमात धनुषनं तिरुचित्रंबलम ही भुमिका साकारली आहे. संपूर्ण सिनेमाची कथा तिरुचित्रंबलमभोवती फिरते. नित्यानं सिनेमात तिरुचित्रंबलमच्या बालपणीच्या मैत्रिणी भुमिका साकारली. शोबना असं तिच्या भुमिकेचं नाव आहे. या सिनेमानं अवघ्या 18 दिसात तब्बल 94.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
तर अभिनेत्री मानसी पारेख हिनं 2023 साली आलेल्या कच्छ एक्सप्रेस सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात फुल्ल ड्रामा पाहायला मिळतो. सिनेमात रत्ना पाठक शाह, मानसी पारेख, धर्मेंद्र गोहिल, दर्शील सफारी आणि विराफ पटेल हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. मानसी पारेख ही स्वत: सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक होती.
विरल शाह यांच्या गुजराती नाटकावरुन हा सिनेमा तयार करण्यात आला. हजार मैलांचा प्रवास एका पावलाने कसा सुरू होतो. त्यात प्रेम आणि आयुष्य कसं उलगडत जात हे दाखवण्यात आलं आहे. शोध कसा घेतो याभोवती हा चित्रपट फिरतो. मानसीनं सिनेमात मोंगी ही भुमिका साकारली. प्रेक्षकांबरोबर समीक्षकांनीही मोंगीच्या भुमिकेचं कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 16, 2024 4:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या नित्या मेनन, मानसी पारेख आहेत तरी कोण?









