Madhurani Prabhulkar: 'गुदमरत होते, सहन होत नव्हतं' त्या गोष्टीबद्दल मधुराणी प्रभुलकरने व्यक्त केली मनातली खदखद

Last Updated:

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि भरपूर लोकप्रियता मिळवलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर.

मधुराणी गोखलेने व्यक्त केली खदखद
मधुराणी गोखलेने व्यक्त केली खदखद
मुंबई :  'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि भरपूर लोकप्रियता मिळवलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. एका आईच्या आयुष्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेचा मोठा चाहतावर्गही बनला आणि मधुराणीचाही. आज तिला अरुधंती म्हणून जास्त ओळखलं जातं. आज जरी ती लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरी एक काळ तिच्या आयुष्यात असा होता की हवी तशी कामं मिळत नव्हती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मधुराणीने त्यावेळी किती त्रास आणि घुसमट होत होती याविषयी स्पष्ट मत मांडंल.
मधुराणीने नुकतीच सौमित्र पोटेंच्या'मित्रम्हणे' या पॉडकास्ट चॅनेलमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी स्पष्ट मत मांडलं.'आई कुठे काय करते' ही मालिका मिळण्याअगोदर मधुराणीला आणखी चांगल्या संधी का आल्या नाहीत? तिचा तो काळ कसा होता? यावर तिने भाष्य केलं. यावेळी ती म्हणाली, 'तो काळ प्रचंड त्रासदायक, हॉरिबल आणि सहन न करता येणारा, गुदमरणारा होता.'
advertisement
मधुराणी पुढे म्हणाली, चांगलं काम न मिळण्याचा योग नव्हता आणि माझी चॉईसही त्याला एक कारण असू शकतं. कारण मी अनेक वर्ष जाहीरातीमध्ये काम केलं तर त्यांना वाटत असेल की मी डेली सोप करणार नाही. त्यावेळेला मला जो पर डे मिळाला असता, जे मी महिन्याभरात कमावले असते, ते मला एका जाहिरातीत मिळायचे. त्यामुळे माझं घर तेव्हा त्यामध्ये चालायचं.
advertisement
'काम तर करायचं होतं, तसं काम बनत होतं, पण मला हवं तसं काम बनत होतं तिथे मी पोहोचू शकत नव्हते. त्यानंतर मी मुलीसाठी काही वर्षांसाठी पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुणे मुंबई जवळ असलं, अडीच-तीन तासात येत असलं तरी ती दोन वेगळीच शहरं आहेत. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मुंबईतच असायला लागतं, हे खरं आहे. नुसता अभ्यास, चिंतन, मनन, निरीक्षण करून उपयोग नाही. कुठेतरी संधी मिळणं गरजेचं आहे. कारण ते करून बघितल्याशिवाय तुम्हाला अभिनय येतो की नाही, हे तुम्हाला कसं कळणार; त्यामुळे प्रचंड प्रमाणातली घुसमट होती, त्रासदायक घुसमट होती', असंही मधुराणी म्हणाली.
advertisement
दरम्यान, आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर अभिनेत्रीने सध्या ब्रेक घेतलाय. ती तिच्या मुलीसोबत पुण्यात वेळ घालवत आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड असते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Prabhulkar: 'गुदमरत होते, सहन होत नव्हतं' त्या गोष्टीबद्दल मधुराणी प्रभुलकरने व्यक्त केली मनातली खदखद
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement