Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन, 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Death:मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
मुंबई: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.
जेष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी धारवाड येथे त्यांनी नाटक सादर केले होते. मात्र सोमवारी सकाळी बेंगळुरूमध्ये पोहोचल्यावर त्यांना छातीत दुखू लागले. लगेच फोर्टिस रुग्णालयात नेले असता, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
advertisement
यशवंत सरदेशपांडे यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्काली गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना नाट्यकलेची आवड होती. त्यांनी हेग्गोडू निनासम थिएटर इन्स्टिट्यूट मधून नाट्यकलेचा डिप्लोमा घेतला. नंतर त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठात सिनेमॅटिक लेखन आणि नाट्यकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
advertisement
यशवंत सरदेशपांडे यांनी 60 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक राजकीय नेते, रंगभूमी कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे. यशवंत सरदेशपांडे यांच्या निधनाने कन्नड रंगभूमीतील एक मोठं नाव हरपलं आहे. त्यांची रंगभूमीवरील उर्जा, विनोदी शैली आणि नाटकातली सशक्त लेखणी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन, 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास