गँगस्टरचा मुलगा आहे अजय देवगन? लहानपणी मुंबईला पळून आले होते , अभिनेत्यानं सांगितला वडिलांचा प्रवास

Last Updated:

वीरू हे बॉलिवूडचे अँक्शन डायरेक्टर होते. वीरू यांचा आतापर्यंतचा प्रवास अजय देवगन यानं कॉफी विथ करणच्या मंचावर सांगितला.

अजय देवगण वडील - कॉफी विथ करण 8
अजय देवगण वडील - कॉफी विथ करण 8
मुंबई, 22 डिसेंबर : करण जोहरच्या कॉफी विथ करण 8च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगण आणि रोहीत शेट्टी येणार आहे. या एपिसोडमध्ये दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेता अजय देवगन यानं त्याच्या वडिलांबद्दल देखील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी सांगितल्या. अजय देवगनच्या वडिलांचं नाव वीरू देवगन. वीरू हे बॉलिवूडचे अँक्शन डायरेक्टर होते. वीरू यांचा आतापर्यंतचा प्रवास अजय देवगन यानं कॉफी विथ करणच्या मंचावर सांगितला.
अजय देवगननं सांगितलं की, त्याचे वडील 13वर्षांचे असताना घर सोडून निघून गेले आणि स्ट्रीट गँगचे मेंबर झाले. तुझ्या वडिलांना योग्य ते कौतुक मिळालं का? असा प्रश्न करणनं अजयला विचारला. त्यावर अजय म्हणाला, 'ते 13 वर्षांचे असताना पंजाबहून विना तिकिट ट्रेननं पळून मुंबईत आले. त्यांना जेल झाली. त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं वेळेला अन्न नव्हतं. तू माझा गाडी धुतलीस तर तुला पैसे मिळतील अशा स्वरूपात त्यांना काही लोकांनी मदत केली. तिथून त्यांनी काम करायला सुरूवात केली.'
advertisement
अजय पुढे म्हणाला, 'त्यानंतर ते कारपेंटर म्हणून काम करत होते. काही वर्षांनी ते मुंबईच्या सायन कोळीवाड्याचे गँगस्टर झाले. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांची गँग होती आणि ते गँग वॉरचा हिस्सा होते.' अजयचं हे बोलणं ऐकूण करण जोहर शॉक झाला.
advertisement
अजयनं पुढे सांगितलं, 'एक दिवस सीनियर अँक्शन डायरेक्टर रवि खन्ना यांनी त्यांना रस्त्यावर फाइट करताना पाहिलं. खन्ना यांनी कार थांबवली आणि वडिलांना विचारलं की तुम्ही काय करता? वडिल म्हणाले, मी कारपेंटर आहे. त्यावर खन्ना म्हणाले, तू फायटिंग चांगली करतो उद्या मला येऊन भेट. अशा पद्धतीनं वडील खन्ना यांचे असिस्टंट म्हणून काम करू लागले आणि त्यानंतर ते बॉलिवूडचे प्रसिद्ध अँक्शन डायरेक्टर म्हणून काम करू लागले.'
advertisement
अजयनंतर रोहीत शेट्टी यानं देखील त्याच्या वडिलांच्या स्ट्रगल लाइफबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'माझेही वडील 13 व्या वर्षी मुंबईत आले आणि एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. नंतर त्यांना बॉडी बिल्डिंग आणि एका सीनियर अँक्शन डायरेक्टरनं त्यांची हाईट पाहिली आणि काम दिलं.' रोहीतचे वडील स्वर्गीयMB शेट्टी हे देखील बॉलिवूडचे प्रसिद्ध अँक्शन डायरेक्टर होते.
advertisement
रोहीत शेट्टी याच्या वडिलाचं 1982 साली निधन झालं. तर करण जोहरच्या वडिलांनी 2004मध्ये या जगाचा निरोप घेतला. अभिनेता अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांना 2019मध्ये देवाज्ञा झाली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
गँगस्टरचा मुलगा आहे अजय देवगन? लहानपणी मुंबईला पळून आले होते , अभिनेत्यानं सांगितला वडिलांचा प्रवास
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement