सैफची मोये मोये मुमेंट ! करिना समजून दुसऱ्याच मुलीला..., तो Video व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
18 डिसेंबर रोजी करीना कपूर, सैफ अली खान मुलगा जेह आणि तैमूर यांच्याबरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाले.
मुंबई, 22 डिसेंबर : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर नेहमीच लाइम लाइटमध्ये राहणारं कपल आहे. सैफ -करीना बॉलिवूडचं रॉयल कपल म्हणून ओळखले जातात. नुकतेच ते दोन्ही मुलांसह त्यांच्या आलिशान अशा पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. दोघांनी पतौडी पॅलेसवरचे फोटो देखील शेअर केले होते. दरम्यान पतौडी पॅलेसवरून मुंबईला परत येत असताना दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दोघांबरोबर मुलगा तैमूर आणि जेह हे दोघे सुद्धा होते. यावेळी सैफची मोये मोये मुमेंट पाहायला मिळाली. सैफनं करीना समजून भलत्याच मुलीला जवळ घेतला.
18 डिसेंबर रोजी करीना कपूर, सैफ अली खान मुलगा जेह आणि तैमूर यांच्याबरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाले. नेहमीप्रमाणे पापाराझी दोघांच्या मागे आले. चौघे ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी पतौडी पॅलेसवर गेले होते. एअरपोर्टवर करीनानं लाल रंगाचा हाफ बॉम्बर जॅकेट कॅरी केला होता आणि याच जॅकेटमुळे सैफ इतका कन्फ्युज झाला की तो करीना ऐकजी दुसऱ्याच मुलीला आपल्याबरोबर घेऊन जात होता.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एअरपोर्टवर चेकींगसाठी सैफ आणि करीना थांबले आहेत. जेह आणि तैमूर देखील त्यांच्याबरोबर आहेत. सगळं चेकींग झाल्यानंतर गडबडीत सैफ त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मुलीला करीना समजून तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला चल म्हणतो. ती मुलगी पुढे येताच सैफला ही करीना नसल्याचं समजत आणि तो लगेच हात बाजूला काढून घेतो. आपण करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर हात ठेवलाय हे कळताच सैफला स्वत:वरच हसू येतं. आपला मोये मोये झालाय हे त्याच्या लक्षात येत. करीनाला देखील हे कळतं पण ती रिअँक्शन देत नाही.
advertisement
advertisement
सैफचा मोये मोये व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेलं नाही. एका युझरनं लिहिलंय, 'करीनाची रिअँक्शन अशी होती की, सैफ आता घरी चल तुला दाखवते'. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, 'दोघी लाल ड्रेसमध्ये होत्या म्हणून बिचारा सैफ कन्फ्युज झाला'. तर आणखी एका युझरनं म्हटलंय, 'करीनाचे एक्सप्रेशन्स बदलले आता सैफची काही खैर नाही'.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2023 8:39 AM IST