'मोये मोये'चा अर्थ अखेर सापडला, नेटकऱ्यांना पडलेला प्रश्न एकदाचा सुटला

Last Updated:

moye moye meaning in marathi : तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत. या आर्टिकलमध्ये मोये-मोये नेमकं काय आहे? आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी तुमची मदत करणार आहोत.

मोये मोये चा मराठी अर्थ काय
मोये मोये चा मराठी अर्थ काय
मुंबई, 30 नोव्हेंबर : 'क्या है ये मोये मोये?' आज काल लोकांना पडलेला हा कॉमन प्रश्न आहे. सोशल मीडिया ओपन केला की प्रत्येक जण या मोहो, मोहेबद्दल बोलत असतो. तसेच या गाण्यावर अनेक रिल्स देखील बनवली गेले आहेत. काही लोकांनी फक्त गाणं ट्रेंड आहे म्हणून त्याचा वापर केला. पण असे बरेच लोक आहेत. ज्यांनी यावर मीम्स बनवले आहेत. पण अनेकांना याचा नेमका अर्थ माहित नसल्यामुळे हे मीम्स पूर्ण बाउंस जातात.
मोये मोयेचा नेमका अर्थ माहित नसल्यामुळे अनेकांना आपण सोशल मीडियाच्या जगात काहीतरी मीस करतोय असं वाटू लागलं आहे. ज्यामुळे लोक याबद्दल गुगलवर सर्च करताय तर काही लोक आपल्या मित्रांना याबद्दल विचारतायत.
तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत. या आर्टिकलमध्ये मोये मोये नेमकं काय आहे? आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी तुमची मदत करणार आहोत.
advertisement
मोये मोये ट्रेंडचा रील तुम्ही अनेकदा पाहिला असेल. जर आपण त्याच्या मूळ व्हिडीओबद्दल बोललो तर मूळ गाण्यात ते 'ये मोये मोरे' आहे. पण भारतात याला रीलमध्ये मोये मोये म्हटले जात आहे. रिल्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हे गाणे खरे तर सर्बियाचे आहे.
तुम्हीही या गाण्याचा रील अनेकदा पाहिला असेल. पण तुम्हाला त्याचा अर्थ माहित नसेल.
advertisement
खरंतर या गाण्याचे शीर्षक 'डेझनम' आहे. हे सर्बियन गायक तेया डोरा हिने गायले आहे. याचं ओरिजनल गाणं यूट्यूबवर पाच कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. आता अनेक रील्समध्ये ते अधिकाधिक भागांमध्ये वापरले जात आहे.
हा आहे खरा अर्थ
मोये मोरेचा अर्थ मराठीत वाईट स्वप्न असा होतो. लोकांच्या वेदना, संघर्ष आणि वारंवार येणारी भयानक स्वप्ने दाखवण्यासाठी हे गाणे बनवण्यात आलं आहे. भारतात ट्रेंड होत असलेल्या रीलमध्ये लोकांच्या वेदनाही दाखवल्या जात आहेत, पण तेही विनोदी पद्धतीने. आत्तापर्यंत त्यावर लाखो रील्स तयार झाल्या आहेत.
advertisement
अशा आहे की तुम्हाला आता याचा अर्थ समजला असणार आणि तुम्ही आता या गाण्यावर बनणारे सॅड रिल्स आणि मीम्स एन्जॉय करु शकता.
हे आहे खरं गाणं. ज्यावरुन रिल्स बनवले जात आहे.
मराठी बातम्या/Viral/
'मोये मोये'चा अर्थ अखेर सापडला, नेटकऱ्यांना पडलेला प्रश्न एकदाचा सुटला
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement