Akshay Kumar Name : 33 वर्षांआधी झाला अक्षयचा 'खिलाडी' कुमार, त्याला हे नाव नेमकं पडलं कसं?

Last Updated:

Khiladi Akshay Kumar : अक्षय कुमारला सगळेच खिलाडी नावाने ओळखतात. पण त्याला हे नाव कसे आणि कधी मिळाले ? हा चाहत्यांच्या मनात आलेला प्रश्न आहे

News18
News18
बॉलिवूडमध्ये खूप स्टार्स अभिनेते आहेत. ज्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांना त्या नावाची मिळालेली उपाधी म्हणजे त्यांची मेहनत आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'महानायक' नाव , धर्मेंद्रला 'हीमॅन' तर ऋतिक रोशनला 'ग्रीक गॉड' अशी नावे काही स्टार्स अभिनेत्यांची आहेत. तसेच अभिनेता अक्षय कुमारला सगळ्यांनाच माहिती आहे की, त्याला 'खिलाडी' नावाने बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. त्याला हे नाव कसे पडले?
बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर कामाची सुरुवात केल्यावर अक्षय कुमारने एक्शन चित्रपट जास्त केले. त्याला कायम त्याच चित्रपटांच्या ऑफर मिळायला लागल्या होत्या. त्याने त्या काळात 'खिलाडी' नावाने ओळख मिळवली. पण 'खिलाडी' नाव त्याला मिळण्याचे कारण समजण्यासाठी आपल्याला त्याचा 33 वर्षांच्या सुरुवातीच्या दिवसांना बारकाईने पाहावे लागेल.
advertisement
कसा झाला अक्षय 'खिलाडी'?
अभिनेता अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सुहाग' चित्रपटातून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. पण हा डेब्यू चित्रपट अक्षयचा काही खास चालला नाही. त्यानंतर 5 जून 1992 मध्ये आलेल्या खिलाडी चित्रपटाने त्याला चांगली ओळख मिळाली. या चित्रपटामुळे अक्षय कुमारचा 'खिलाडी' अक्षय कुमार झाला. खिलाडीच्या या प्रवासाने संपूर्ण बॉलिवूडला त्याच्या एक्शनची भूरळ पडली. खरंतर सिनेसृष्टीत यायच्या अगोदर अक्षय कुमार हा मार्शल आर्ट खेळाडू होता. तो ब्लॅक बेल्ट आहे.
advertisement
अक्षय कुमारचे 'खिलाडी' नावे असलेले चित्रपट
आतापर्यंत बॉलिवूड करियरमध्ये अक्षय कुमार 8 खिलाडी नाव असलेल्या चित्रपटात काम केले आहेत. त्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. चित्रपट म्हणजे खिलाडी तू अनाडी (1994), सबसे बडा खिलाडी (1995), खिलाडियों का खिलाडी (1996), मिस्टर एंड मिसेज खिलाडी (1997), इंटरनॅशनल खिलाडी (1999), खिलाडी 420 (2000)आणि खिलाडी 786 (2012) हे खिलाडी नाव असलेले त्याचे चित्रपट आहेत. बॉलिवूडमध्ये अशी नावे चित्रपटांची असलेला हा एकमेव अभिनेता आहे.
advertisement
अक्षय कुमारचे काम
अक्षय कुमार आता 58 वयाचा आहे. यावर्षी त्याचे 'जॉली एलएलबी', 'स्काय फोर्स', 'केसरी चॅप्टर 2' आणि 'हाऊसफुल 5' हे चार चित्रपट रिलीज झाले आहेत. पण यातील एकाही चित्रपटाला फारसे काही कलेक्शन बॉक्स ऑफिसवर गोळा करता आले नाही. त्याच्याकडे काही चित्रपटाचे प्रोजेक्ट आहेत. ज्यात 'हैवान', 'भूत बंगला', 'हेरा फेरी 3' आणि 'वेलकम टू द जंगल' यासारखे प्रमुख चित्रपट आहे. 'रावडी राठोड 2' , 'स्त्री 3' आणि 'भागम भाग' या सिनेमांमध्ये अक्षय कदाचित दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshay Kumar Name : 33 वर्षांआधी झाला अक्षयचा 'खिलाडी' कुमार, त्याला हे नाव नेमकं पडलं कसं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement