Mumbai Local : मुंबई लोकलचा प्रवास फुकटात, हे ॲप वापरून रेल्वेलाच चुना, मुंबईत हे काय सुरूये?

Last Updated:

Mumbai Local UTS Ticke Scam : मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवास करण्यासाठी काही प्रवासी यूटीएस अॅपच्या तिकिटांचे स्क्रीनशॉट एडिट करून बनावट पास तयार करत आहेत. खोट्या क्यूआर कोडचा वापर करून एसी लोकलमध्ये फसवणूक वाढत असून रेल्वे प्रशासन कडक कारवाई करत आहे.

Mumbai Local scam
Mumbai Local scam
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. पण या प्रवाशांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसते. आता तर फुकट प्रवासासाठी काही जणांनी अगदी नवीन जुगाड ही शोधून काढला आहे. हा जुगाड नेमका कसा काम करतो आणि त्यामुळे रेल्वे प्रशासन कोणत्या अडचणीत सापडले आहे हे जाणून घ्या.
नेमकं घडतय तरी काय?
लोकल तिकीट किंवा सीझन पास अधिकृतपणे यूटीएस अॅपमधून सहज मिळू शकतात. पण काही प्रवाशी त्याचा फायदा न घेता खोटे स्क्रीनशॉट, एडिट केलेली तारीख आणि बनावट क्यूआर कोड वापरून रेल्वेची फसवणूक करत आहेत. 2025 च्या जुलै महिन्यात पश्चिम रेल्वेला असा पहिला बनावट यूटीएस पास सापडला. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच अशी अनेक प्रकरणे उघड झाली. विशेषतः एसी लोकल सुरू झाल्यापासून हा प्रकार आणखी वाढल्याचे रेल्वे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
advertisement
अलीकडेच मंगळवारी विरार एसी लोकलमध्ये एका प्रवाशाला अशीच बनावट तिकीट दाखवताना पकडले. नायगाव स्थानकात सायंकाळी तपासणी सुरू असताना त्या व्यक्तीने यूटीएस अॅपवरचे तिकीट दाखवले. पहिल्यांदा ते खरे वाटले, पण क्यूआर कोड स्कॅन करताच त्रुटी दिसून आल्या. तपासणी अॅपमध्ये ते तिकीट मुळातच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. त्या प्रवाशाने जुन्या तिकीटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावर तारीख बदलून नवे तिकीट असल्याचा भास निर्माण केला होता. त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला आणि वसई पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. याशिवाय दंड देखील आकारण्यात आला.
advertisement
रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांत विशेषतः पश्चिम रेल्वे विभागात यूटीएस अॅपचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसी लोकलमध्ये असे प्रकार सर्वाधिक आढळत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. क्यूआर कोडची तपासणी, सीझन पासची बारकाईने चाचणी आणि संशयित तिकिटांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवाशांना अधिकृतपणेच तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले असून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबई लोकलचा प्रवास फुकटात, हे ॲप वापरून रेल्वेलाच चुना, मुंबईत हे काय सुरूये?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement