advertisement

वडील 'मेहता' मग मलायका का लावते 'अरोरा' आडनाव? काय आहे तिच्या नावाचं गुपित?

Last Updated:

anil mehta was stepfather of malaika arora : मलायकाने वडिलांच्या निधनाची माहिती देण्यासाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुद्धा अनिल मेहता असं नाव लिहिलेलं आहे. यामुळे अनिल हे मलायकाचे जन्मदाते वडील नव्हते, असा अंदाज लावला जात आहे. काय आहे यामागचं नेमकं सत्य?

मलायका अरोरा
मलायका अरोरा
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बुधावारी (11 सप्टेंबर) आत्महत्या केली. माजी मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या अनिल यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. मलायकाच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा सर्वत्र त्यांचा उल्लेख 'अनिल अरोरा' असा करण्यात आला होता. पण, पोलिसांनी माहिती दिली त्यात, त्यांचा उल्लेख 'अनिल मेहता' असा करण्यात आला आहे. शिवाय, मलायकाने वडिलांच्या निधनाची माहिती देण्यासाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुद्धा अनिल मेहता असं नाव लिहिलेलं आहे. यामुळे अनिल हे मलायकाचे जन्मदाते वडील नव्हते, असा अंदाज लावला जात आहे.
मलायकाने वडिलांच्या निधनाची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, ते तिचे अतिशय चांगले मित्र होते. शिवाय, तिने त्यांचा उल्लेख अनिल मेहता असा केला आहे. असं म्हटलं जात आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी अनिल यांनी मलायकाची धाकटी बहिण अमृताशी फोनवर संवाद साधला होता.
advertisement
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, अनिल हे मलायका आणि अमृताचे जन्मदाते वडील नव्हते. कारण, मलायका आणि त्यांच्या वयात फक्त 11 वर्षांचं अंतर असल्याचं म्हटलं जात आहे. अनिल मेहता यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता तर मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झालेला आहे.
advertisement
वेगवेगळ्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, अनिल मेहता यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प यांचं एक लग्न झालेलं होतं. पहिल्या पतीपासून जॉयस यांना मलायका आणि अमृता या दोन मुली झाल्या होत्या. नंतर त्या पतीपासून वेगळ्या झाल्या.
मल्याळी ख्रिश्चन असलेल्या जॉयस यांनी अनिल मेहतांशी दुसरं लग्न केलं. जॉयस आणि अनिल मेहतासुद्धा लग्नानंतर काही वर्षांनी वेगळे झाले. दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा मलायका 11 वर्षांची होती. मलायकाने सुद्धा एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. पण, तिच्या आई-वडिलांच्या वैवाहिक आयुष्याविषयी इतर कोणतीही माहिती तिने दिली नव्हती. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील असल्याचा फक्त दावा केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
वडील 'मेहता' मग मलायका का लावते 'अरोरा' आडनाव? काय आहे तिच्या नावाचं गुपित?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement