'बाळासाहेबांचा माझ्यावर खूप जीव होता' वंदना गुप्तेंनी सांगितलं कसं होतं दोघांचं नातं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Vandana Gupte on Balasaheb Thackeray: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते ज्यांनी दमदार अभिनय आणि ठकसेबाज अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते ज्यांनी दमदार अभिनय आणि ठकसेबाज अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. फक्त सिनेमाच नाही तर त्या नाटक आणि मालिकांमधूनही घराघरांत पोहोचल्या आणि सर्वांची मने जिंकली. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमुळे त्या सध्या चर्चेत आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविषयीचे अनेक भन्नाट किस्सेही सांगितले.
वंदना गुप्ते यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडल्या. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले त्यांच्या लहानपणापासूनचे नाते आणि आठवणी त्यांनी खूप मोकळेपणाने शेअर केल्या. या मुलाखतीत त्यांनी सांगितले, “बाळासाहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. ते मला ‘भूत’ म्हणायचे. कधीच माझं नाव घेतलं नाही.”
advertisement
वंदना गुप्ते यांनी एक मजेदार आठवण सांगितली की, “माझ्या आईला क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे आम्ही सामना पाहायला जात असू. एकदा मला बाळासाहेब दिसले आणि मी त्यांच्या हाताला धरून थेट पॅव्हिलियनमध्ये गेले. त्या दिवशीपासून मला क्रिकेटचं वेड लागलं.”
वंदना गुप्ते यांनी बाळासाहेबांच्या कलाकारांवरील प्रेमाबद्दलही सांगितले. “ते नेहमीच कलाकारांची काळजी घ्यायचे. मदतीसाठी कोणी काही विचारले, तर त्यांनी कधीच नकार दिला नाही. माझ्या आईच्या नावाने एका बागेचं उद्घाटन करताना ते स्वतः आले आणि निधीही दिला. त्यांच्या शेवटच्या दिवसांतील काही फोटो माझ्याकडे आहेत. अगदी शेवटच्या 4-5 दिवसांपूर्वीचे फोटो. त्यांच्या बरोबर फार घरगुती नाते होतं. असा माणूस पुन्हा होणं शक्य नाही. महाराष्ट्रासाठी एवढं प्रेम असलेला दुसरा कोणी होणार नाही,” असं म्हणत वंदना गुप्ते भावुक झाल्या.
advertisement
दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी एक खुलासाही केला. त्या म्हणाल्या, “मला राजकारणात जाण्याची संधी होती, पण मी ती घेतली नाही. मला अभिनय हेच क्षेत्र जवळचं वाटतं.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बाळासाहेबांचा माझ्यावर खूप जीव होता' वंदना गुप्तेंनी सांगितलं कसं होतं दोघांचं नातं