'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर'च्या पडद्यामागचा हिरो हरपला, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर'च्या पडद्यामागचा हिरो हरपला आहे. वयाच्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे दु:खद निधन झाले आहे.
Anil Kalelkar : 'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर' अशा अनेर सुपरहिट मालिकांचा पडद्यामागचा हिरो हरपला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने त्यांचे दु:खद निधन झाले आहे. अनिल मधुसूदन कालेलकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी बांद्रा येथे झाला. प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे झाले. ते अविवाहित होते. अनिल कालेलकर यांनी आपली भाची गौरी कालेलकर चौधरीसोबत 'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन'ची स्थापना केली. अनिल कालेलकर हे अनेक वर्ष बांद्रा येथील साहित्य सहवालमध्ये वास्तव्याला होते. अनिल कालेलकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कोण होते अनिल कालेलकर?
अनिल कालेलकर यांचे लेखनकार्य अत्यंत बहुआयामी आणि अपूर्व असे होते. त्यांनी 25 पेक्षा अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच 25 पेक्षा अधिक हिंदी, मराठी, गुजराती मालिकांचंही लेखन केलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने लेखन करणारे ते एकमेव लेखक होते.
अनिल कालेलकर यांनी 17 मालिकांचे सलग लेखन केलं आहे. दूरदर्शन क्षेत्रातील एक दुर्लक्ष आणि अभूतपूर्व विक्रम त्यांच्या नावे आहे. अनिल कालेलकर यांच्या हिंदी व मराठी मिळून 12 सस्पेन्स, थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला उल्लेखनीय यश मिळालं आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक विविध विषयांवर लेखन केलं आहे आणि प्रत्येक विषयावर प्रभावी मांडणी केली आहे.
advertisement
'बंदिनी','परमवीर','हॅलो इन्सपेक्टर' या तिनही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळणं ही विलक्षण हॅट्रिक त्यांच्या नावे आहे. अनिल कालेलकर यांनी मांडलेले विषय, कथा आणि आशय आज अनेक चॅनल्स ज्याप्रकारे स्वीकारतात. त्या संकल्पना त्यांनी अनेक दशकांपूर्वीच आपल्या लेखणीतून साकारल्या होत्या. अनिल कालेलकर यांच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. त्यांचे अंतिम संस्कार सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 3:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बंदिनी', 'हॅलो इन्सपेक्टर'च्या पडद्यामागचा हिरो हरपला, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास











