"लपवण्यासारखं काही नाही..."; नम्रता-महेश बाबूसोबतच्या नात्यावर शिल्पाने सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
shilpa shirodkar on namrata shirodkar mahesh babu : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही बिग बॉस 18मध्ये सहभागी झाली आहे. शिल्पाने बहिण नम्रता शिरोडकर आणि मेहुणा महेश बाबू यांच्याबद्दल काय म्हटलं आहे पाहूयात.
मुंबई : बॉलिवूडची नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकर बिग बॉस 18 मध्ये सहभागी झाली आहे. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांनी तिच्या सहभागाबद्दल जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बिग बॉस 18 मध्ये येण्याआधी शिल्पाने एका मुलाखतीत नम्रता आणि महेश तिला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत असा खुलासा केला होता. शिल्पा बहिण आणि मेहुण्याविषयी काय म्हणाली?
बिग बॉसमध्ये येण्याआधी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिल्पा म्हणाली होती, "ते दोघे माझ्यासाठी खूप आनंदी आहेत. त्यांना माझा खूप अभिमान आहे. मी जे काही करेन ते मी स्वतः करेन. मला माहित आहे की मला त्यांचा खूप अभिमान वाटेल. फॅमिली म्हणून आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. त्यांचा मला पाठिंबा आहे".
शिल्पाने नम्रता आणि महेशबद्दल बोलण्यास नकार दिल्याचं वृत्त इंडिया टुडेच्या एका दिवसानंतर ही मुलाखत समोर आली. शिल्पाने ‘तिची बहीण नम्रता शिरोडकर आणि मेव्हणा महेश बाबूबद्दल बोलण्यास नकार दिला,’ असं त्यांनी म्हटलं होतं.
advertisement
शिल्पा म्हणाली, "शोमध्ये लपवण्यासारखं तिच्याकडे काहीही नाही. माझ्याकडे कोणतेही सिक्रेच नाहीत आणि म्हणून मला सावध किंवा प्रतिमा-जागरूक राहण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः असेन आणि मनापासून खेळ खेळेन"
शिल्पा आणि सलमान खान यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शिल्पाने किशन कन्हैया, खुदा गवाह, गोपी किशन, बेवफा सनम आणि रिटर्न ऑफ ज्वेल थीफ यासारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. दुसरीकडे नम्रताने जब प्यार किसीसे होता है या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. नम्रता आणि सलमान एकमेकांना ओळखतात पण ते एकमेकांचे मित्र नाहीत.
advertisement
याबिग बॉस 18 मध्ये शिल्पा शिरोडकरबरोबर नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, शेहजादा धामी, गुणरत्न सदावर्ते, सारा अरफीन खान, अरफीन खान, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन राज, चाहत पांडे, ॲलिस कौशिक, हेमा शर्मा उर्फ विरल भाभी, तजिंदर बग्गा, छिंदम बग्गा यांच्याशी होईल. ट्रॉफीसाठी ईशा सिंग, करणवीर मेहरा आणि मुस्कान बमने हे सदस्य आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2024 9:32 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
"लपवण्यासारखं काही नाही..."; नम्रता-महेश बाबूसोबतच्या नात्यावर शिल्पाने सोडलं मौन