'माझं पूर्ण खानदान तुझ्यासोबत...' Bigg Boss च्या घरातून बाहेर येताच आवेझ दरबारने अमाल मलिकला ठणकावलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Awez Darbar : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच आवेझ दरबारने एका मुलाखतीत अमाल मलिकवर तुफान हल्ला चढवला असून, त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे.
मुंबई : 'बिग बॉस १९' मधून नुकताच बाहेर झालेला कंटेन्ट क्रिएटर आवेश दरबार आणि गायक अमाल मलिक यांच्यात सुरू असलेला तणाव आता घराबाहेरही थांबायला तयार नाहीये. घरातून बाहेर येताच आवेझ दरबारने एका मुलाखतीत अमाल मलिकवर तुफान हल्ला चढवला असून, त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे.
आवेझ दरबारने अमाल मलिकला ठणकावलं
एका मुलाखतीत आवेझ दरबारने अमाल मलिकने केलेले सगळे आरोप सडेतोडपणे फेटाळले. अमालने त्याला २० लाख रुपयांचे काम दिले होते, या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आवेझ खूप चिडला. तो स्पष्टपणे म्हणाला, "काम तू मला देशील? पण मला स्वतःलाच तुझ्यासोबत काम करायचं नाहीये."
आवेझने पुढे स्पष्ट केले की, तो आणि अमाल चांगले मित्र होते, पण तो अचानक शत्रू कसा बनला, हे त्याला समजत नाही. आवेझने प्रश्न विचारला की, तो आता त्याच्या कामाबद्दल आणि तो किती फी घेतो, याबद्दल का बोलत आहे? या वादाचा शेवट करताना आवेझने दिलेली धमकी खूपच नाट्यमय आणि प्रोफेशनल होती.
advertisement
आवेझ दरबारने घेतली अमाल मलिकसोबत काम न करण्याची शपथ
आवेझ संतापाने म्हणाला, "मी खात्री करेन की माझा अख्खा परिवार पण तुझ्यासोबत काम करणार नाही." तो इतक्यावरच थांबला नाही, तर तो म्हणाला की, त्याचा कोणताही मित्र जर अमालसोबत काम करत असेल, तर तो त्यालाही ते काम थांबवायला सांगेल. ही धमकी देऊन त्याने आपल्या आणि अमालच्या वादाला आता थेट चित्रपट जगतातील कामाच्या स्तरावर आणून ठेवले आहे.
advertisement
या मुलाखतीत आवेझने केवळ अमालवरच टीका केली नाही, तर त्याने अभिनेत्री शुभी जोशीने लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांवरही आपले मौन सोडले. सोबतच त्याने कॉमेडियन शहबाज बादशाहच्या वाईट विनोदांसाठीही त्याची कानउघाडणी केली. आवेझने शेवटी अमालचे वडील डब्बू मलिक आणि भाऊ अरमानलाही संदेश दिला की, त्यांनी या वादात पडू नये, कारण ते दोघे समजदार आहेत आणि एकमेकांना सांभाळून घेतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझं पूर्ण खानदान तुझ्यासोबत...' Bigg Boss च्या घरातून बाहेर येताच आवेझ दरबारने अमाल मलिकला ठणकावलं