Bigg Boss 19च्या घरात त्या रात्री काय घडलं? 16 स्पर्धकांचा एका फटक्यात गेला असता जीव

Last Updated:

Bigg Boss 19 Tragedy : बिग बॉस 19च्या घरातील 16 स्पर्धकांचा एका फटक्यात जीव गेला असता. बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

News18
News18
मुंबई : बिग बॉस 19 प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हा सीझन देखील हिट होईल असं म्हटलं जातंय. या सीझनमध्येही 16 दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. सगळेच अतरंगी स्पर्धक घरात चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिग बॉस 19च्या घरातील 16 स्पर्धकांचा एका फटक्यात जीव गेला असता. सोशल मीडियावर एका क्रिएटरनं शेअर केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. बिग बॉस 19च्या घरात नेमकं काय घडलं?
बिग बॉस 19च्या घरात दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉसच्या एक्स स्पर्धक शेहनाज गिलचा भाऊ शेहबाज बदेशाची एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीनंतर घरातील वातावरण काहीस बदललं आहे. याच दरम्यान बिग बॉस 19च्या घरात घडणारा मोठा अनर्थ टळला आहे.
advertisement
tellysuper.in हे बिग बॉस 19शी संबंधित डेली अपडेट देणारं एक पेज आहे. त्यांनी त्यांच्या पेजवर ही माहिती शेअर केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, घरात रात्री एका स्पर्धकाने चुकून गॅस ऑन ठेवला. रात्रभर घरात गॅस ऑन ठेवल्याने मोठी दुर्घटना घडली असतील. घरातील एकूण 16 स्पर्धकांचा एका फटक्यात जीव गेला असता. संपूर्ण सेट जळून खाक झाला असला.
advertisement
स्पर्धक बशीर अली या निष्काळजीपणावर प्रचंड चिडला. हा बेजबाबदारपण किती महागात पडला असता याचं गांभीर्य त्याने सांगितलं. घरातील सदस्यांनी त्यांची ही चूक मान्य केली आणि माफी देखील मागितली. वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या बशीर याने पहिल्याच दिवशी त्याचा आवाज दाखवून दिला आहे. आता घरात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या मुद्द्यावर पुढच्या विकेंड का वारला सलमान खान कोणाची कशी शाळा घेणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
शेहनाजच्या भावाने घरात एन्ट्री घेताच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने हातावर बिग बॉसच्या एक्स स्पर्धक दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू त्याच्या हातावर काढला आहे. त्याच्याशी त्याचं असलेला इमोशनल बॉन्ड यावेळी दिसून आला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19च्या घरात त्या रात्री काय घडलं? 16 स्पर्धकांचा एका फटक्यात गेला असता जीव
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement