Bigg Boss 19: मराठमोळ्या प्रणित मोरेसमोर अमाल मलिकही फिका, टास्कमध्ये ठरला सर्वांचा बाप! VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pranit More in Bigg Boss 19 : बिग बॉस १९ च्या नव्या टास्कमध्ये मराठमोळ्या प्रणीत मोरेने अक्षरशः सगळ्यांनाच मागे टाकलं. त्याच्यासमोर आवेझ दरबार आणि अमाल मलिकही फिके पडले.
मुंबई : सलमान खानच्या ‘बिग बॉस १९’ मध्ये रोज काहीतरी नवीन घडामोडी होत आहेत. पण, नुकताच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये एका खास शो ठेवण्यात आला होता. यावेळी जी धमाल झाली ती पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याचं काम दिलं होतं. या टास्कमध्ये मराठमोळ्या प्रणीत मोरेने अक्षरशः सगळ्यांनाच मागे टाकलं.
प्रणीतच्या जोक्ससमोर बाकी सर्व फिके!
या खास शोचं नाव होतं 'द बिबि शो'. सगळ्यात आधी प्रसिद्ध डान्सर आवेज दरबार स्टेजवर आला. त्याने आपल्या डान्सने सगळ्यांना इम्प्रेस केलं आणि भरपूर टाळ्याही मिळवल्या. त्यानंतर गायक अमाल मलिकनेही लगेच एक गाणं कंपोज केलं आणि सगळ्यांना खूश केलं. त्याच्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं.
पण खरी मजा आली ती जेव्हा स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे स्टेजवर आला. त्याने असे काही जोक्स सांगितले की, स्पर्धकांना हसू आवरता आलं नाही. प्रणीतने प्रत्येक स्पर्धकाचं बारीक निरिक्षण केलं होतं. याचा वापर त्याने आपल्या टास्कमध्ये केला. त्याने प्रत्येकाच्या सवयींवर मजेशीर जोक्स केले. त्याचे जोक्स ऐकून तान्या मित्तलही उठून टाळ्या वाजवू लागली. प्रणीतने सगळ्यांनाच त्याच्या विनोदी शैलीने जिंकलं.
advertisement
advertisement
आता ‘वीकेंड का वॉर’मध्ये काय होणार?
आता लवकरच ‘बिग बॉस १९’चा ‘वीकेंड का वॉर’ येणार आहे. यात सलमान खान पुन्हा एकदा स्टेजवर दिसणार आणि स्पर्धकांचा क्लास घेणार आहे. गेल्या ‘वीकेंड का वॉर’मध्ये सलमानने प्रणीत मोरेची चांगलीच शाळा घेतली होती. त्यावेळी सलमान म्हणाला होता की, प्रणीत दुसऱ्यांच्या नावावर कंटेंट विकत आहे. पण, आता प्रणीतने त्याचा दमदार परफॉर्मन्स दाखवला आहे. त्यामुळे आताच्या ‘वीकेंड का वॉर’मध्ये काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत की, प्रणीतबद्दल सलमान काय म्हणणार.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19: मराठमोळ्या प्रणित मोरेसमोर अमाल मलिकही फिका, टास्कमध्ये ठरला सर्वांचा बाप! VIDEO VIRAL


