अरे देवा काय रे हे! लेव्हल सोडली शोने, प्रेक्षक भडकले; Bigg Boss Marathi 6 मध्ये असं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर प्रेक्षक भडकले आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बॉस मराठी 6 मध्ये दररोज काही ना काही नवीन ड्रामा पाहायला मिळतो. हा सीझन म्हणावा तसा प्रेक्षकांना आवडला नाही. वाइल्ट कार्डमधून राखी सावंतची एंट्री झाल्यानंतर अनेकांची हा शो पाहण्याची उत्सुकता वाढली. पण आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात असं काही घडलं आहे की प्रेक्षक भडकले आहेत.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. अरे देवा काय रे हे, लेव्हल सोडली शोने, अशा प्रतिक्रिया हा प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उमटत आहे. असं नेमकं बिग बॉसच्या घरात घडलं तरी काय पाहुयात.
advertisement
प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला राखी तन्वीला विचारते हा कुठला डान्स आहे, यावर तन्वी तिला उत्तर देते त्याला विचार ना. यानंतर राकेश तन्वीला किस करताना दिसतो आहे. पुढे तो राखीसमोरही पुन्हा तन्वीला किस करतो. राखी रागात त्यांच्याकडे बघताना दिसते. नंतर ती दोघांसमोर म्हणते माझा परिणाम बघा आणि स्वत:चे केस कापताना दिसते.
advertisement
राकेश आणि तन्वी तिला विचारतात की राखी तू हे काय करते आहे, राखी म्हणते, राकेश मी शिक्षा देते आहे. कुणी मला दुखवू शकत नाही मी स्वत:च मला हर्ट करू शकते, असं म्हणत ती रडते. प्रोमोच्या शेवटी राखीच्या रडण्याचा आवाज येतो.
advertisement
राखीच्या या कृत्याने घरातील सगळ्या सदस्यांना धक्का बसलेला दिसतो. रुचिता, राकेश तोंडावर हात घेतात. दिपाली राखीला धीर देताना दिसते. 'राकेशमुळे दुखावलं राखीचं मन', असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
पण घरातील हा नवा ड्रामा प्रेक्षकांना मात्र आवडलेला नाही. जवळपास सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 12:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अरे देवा काय रे हे! लेव्हल सोडली शोने, प्रेक्षक भडकले; Bigg Boss Marathi 6 मध्ये असं काय घडलं?







