advertisement

एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांचं जेवण बंद, कुणालाच खायला मिळणार नाही

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात नवा ड्रामा पाहायला मिळतो आहे. एका सदस्याच्या चुकीची शिक्षा घरातील सगळ्या सदस्यांना भोगावी लागते आहे. एका सदस्यामुळे सगळ्यांवर उपाशी राहायची वेळ आली आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्यांचं जेवण बंद करण्यात आलं आहे. कुणालाच खायला मिळणार नाही आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे घरातील एक सदस्य. घरातील एका सदस्याच्या चुकीची शिक्षा आता सगळ्यांना मिळणार आहे. त्याच सदस्याच्या चुकीमुळे इतरांना जेवायला मिळणार नाही.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचे प्रोमो समोर आले आहेत. ज्यात जेवणावरून वाद झालेला दिसतो आहे. अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रेमध्ये हा वाद झाला आहे. प्रोमोत तुम्ही पाहू शकता किचजनजवळ सोफ्यावर प्राजक्ता बसली आहे. तर अनुश्री आणि रुचिता डायनिंग टेबलवर.
advertisement
अनुश्री प्राजक्ताला बोलते तुमच्यामुळे जेवण थांबलाय ना सगळ्यांचं. आपण आपली ड्युटी करायची आणि त्यांनी त्यांची जेवणाची ड्युटी करायची नाही. मी माझी ड्युटी करून आले आहे, मला जेवण मिळायलाच पाहिजे. करून घ्या ना ते. तिथल्या तिथं कचरा आहे. यावर प्राजक्ता म्हणते मी नाही झुकणार आहे.
advertisement
अनुश्री आणि प्राजक्ताच्या बोलण्यावरून हा वाद कचरा आणि जेवण यावरून झाला आहे. याआधी राखी आणि प्राजक्तामधील संवादाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी प्राजक्ताला कचरा काढायला सांगते. त्यावर प्राजक्ता मुलं करतील मिळून मी आता अंघोळ केली आहे, अंघोळीनंतर कचरा काढायला मला जमणार नाही असं सांगते.
advertisement
यावर राखी भडकते आणि बोलते, बिग बॉसने मला काम सांगितलं आहे, ते मी करणाच. हे लोक मला सीरिअसली घेत नाहीत. जे होणार ते मी आता बघून घेणार. मी आता कुणालाही रिक्वेस्ट करणार नाही.
advertisement
राखी, प्राजक्ता आणि प्राजक्ता अनुश्री यांच्यातील संवाद ऐकल्यानंतर प्राजक्ताने केर काढला नाही म्हणून राखीने घरातील सगळ्यांचं जेवण बंद केल्याचं दिसतं आहे. म्हणजे एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना मिळते आहे.
आता प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील इतर सदस्यांना भोवणार का? त्याचा कोणता परिणाम होणार, बिग बॉसच्या घरात कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांचं जेवण बंद, कुणालाच खायला मिळणार नाही
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement