Village Recipe : जुनी पण खास, झटपट आणि झणझणीत सांडग्याची भाजी! चवीला भन्नाट, बनवायला अगदी सोपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Maharashtria special sandgyachi bhaji recipe : बऱ्याच लोकांना पारंपरिक रेसिपी माहित नसतात किंवा माहित असल्या तरी त्या कशा बनवायच्या ते ठाऊक नसतं. आज आम्ही तुम्हाला अशीच एक जुनी पण पारंपरिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी सांगत आहोत.
मुंबई : आपल्याकडच्या जुन्या रेसिपीज चवीने आणि पोषणाई समृद्ध असतात. मात्र बऱ्याच लोकांना त्या माहित नसतात किंवा माहित असल्या तरी त्या कशा बनवायच्या ते ठाऊक नसतं. आज आम्ही तुम्हाला अशीच एक जुनी पण पारंपरिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी सांगत आहोत. इंस्टाग्रामवर whatss_cooking_ या अकाऊंटवर ही रेसिपी दाखवली गेली आहे.
सांडगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- हरभरा डाळ
- तूर डाळ
- मूग डाळ
- मसूर डाळ
- उडीद डाळ
- धने
- जिरे
- आलं
- लसूण
- हिरवी मिरची
- भाजलेलं सुकं खोबरं
- भाजलेला कांदा
- कोथिंबीरची देठं
- चिरलेला कांदा
- चिरलेले टोमॅटो
सांडगे बनवण्याची कृती
- हरभरा, तूर, मूग, मसूर, उडदाची डाळ घ्या आणि या सर्व डाळी एकत्र करून १ तास भिजवा.
advertisement
- एका तासांनंतर भिजवलेल्या डाळीतील पाणी काढून घ्या.
- आता या डाळींमध्ये धने, जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची घाला आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता या मिश्रणामध्ये तिखट, मीठ, कोथिंबीर आणि थोडा रगडून घाला. हे सर्व एकत्र करून घ्या.
- आता या तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून ते वाफवण्यासाठी एका चाळणीला तेल लावून त्यामध्ये ठेवा आणि वाफवून घ्या.
advertisement
- भाजीचा मसाला बनवण्यासाठी भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीरची देठं किंवा कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करू घ्या.
- कढईत तेल घ्या आणि त्यामध्ये जिरे चिरलेला कांदा, टोमॅटो घालून चांगला परतून घ्या.
advertisement
- परतलेल्या कांद्यामध्ये चिकन मसाला, काश्मिरी लाला मिरचीचं तिखट आणि वाटलेला मसाला घाला.
- हे सर्व चांगले परतून कढईवर ताट ठेऊन त्यामध्ये पाणी टाका आणि थोडा वेळाने हे पाणी कढईतील मसाल्यामध्ये टाका.
- कढईतील मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हवे असेल तर आणखी पाणी, उकडलेले सांडगे आणि कोथिंबीर टाकून शिजवा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 1:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Village Recipe : जुनी पण खास, झटपट आणि झणझणीत सांडग्याची भाजी! चवीला भन्नाट, बनवायला अगदी सोपी







