advertisement

'आता कुठे गेली तुमची माणुसकी?' राखीच्या रडण्यावर हसणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, सोशल मीडियावर झाप-झाप झापलं!

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुश्री आणि प्राजक्ताची चांगलीच शाळा घेतली आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात काल प्रेक्षकांना भावनांचं एक वेगळंच रोलरकोस्टर पाहायला मिळालं. एका टास्क दरम्यान घरातील प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. कन्फेशन रूममध्ये एक टेलिफोन ठेवण्यात आला होता. घरातील प्रत्येक सदस्याने त्यांच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीबद्दलच्या त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी आपल्या आईबद्दल बोलताना राखी ढसाढसा रडली. मात्र, यावेळी घरातील इतर स्पर्धकांच्या कृत्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली जात आहे.
कन्फेशन रूममध्ये बसून राखी सावंत आपल्या दिवंगत आईच्या आठवणीत रडत असताना, बाहेर बसलेल्या अनुश्री आणि प्राजक्ता यांना मात्र हसू आवरत नव्हतं. या प्रकारामुळे केवळ प्रेक्षकच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिचाही पारा चढला आहे. रुपालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दोघींचीही चांगलीच शाळा घेतली आहे.

राखीचं काळीज पिळवटून टाकणारं रडणं

advertisement
बिग बॉसने घरात एक 'खोटा टेलिफोन' टास्क दिला होता, जिथे सदस्यांना आपल्या प्रिय व्यक्तीशी मनातलं बोलायचं होतं. राखी सावंतने आपल्या आईला फोन लावला. राखी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात असतानाच तिच्या आईचे कॅन्सरने निधन झाले होते. आईच्या आठवणीने राखी ढसाढसा रडत होती, तिच्या वेदना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. मात्र, नेमक्या याच वेळी बाहेर बसलेल्या अनुश्री आणि प्राजक्ता एकमेकींकडे बघून हसत होत्या. हे पाहून खुद्द बिग बॉसनेही त्यांना खडसावलं.
advertisement

"अनुश्री तू हार्टलेस आहेस का?" रुपालीचा थेट सवाल

रुपाली भोसलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत या दोघींचा समाचार घेतला. ती म्हणाली, "खरंच अनुश्री-प्राजक्ता... प्राजक्ता तू तर खूप बोलतेस, माणुसकीबद्दल. मग आता कुठे गेली गं? आणि अनुश्री तू खरंच हार्टलेस आहेस का? राखी कॉमेडी करत होती का? अगं मग तू विशालला बाद केलंस तेव्हा का रडलीस? ते ही हसण्यासारखंच होतं. प्राजक्ता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
advertisement
रुपालीनं पुढे अनुश्रीच्या रडण्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "प्राजक्ता आता हस आणि अनुश्री तूही हसत हसत बोल. किती खोटे आहात तुम्ही? एखाद्याचं व्यक्त होणं तुमच्यासाठी मस्करी आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता ते मात्र खरं...हा विनोद आहे का तुमच्यासाठी?"
advertisement

अनुश्रीचं अजब स्पष्टीकरण

जेवण बनवताना अनुश्रीने राखीला यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, "अगं, तुझे आय लॅशेस गळून गालावर आले होते, ते पाहून मला हसू आवरलं नाही." मात्र, हे कारण प्रेक्षकांना आणि रुपालीला मुळीच पटलेलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या भावनांचा अपमान करण्यासाठी अशा फालतू गोष्टीचं कारण देणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आता कुठे गेली तुमची माणुसकी?' राखीच्या रडण्यावर हसणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, सोशल मीडियावर झाप-झाप झापलं!
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement