"असं काय तर दाखवत जावा", बिग बॉसने असं काय दाखवलं की प्रेक्षक झाले खुश, पाहा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे जो पाहून प्रेक्षक म्हणाले "असं काय तर दाखवत जावा", बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलं? पाहूयात.
मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन एक महिना उलटला आहे. सीझन सुरू झाल्यापासून त्याची तुफान चर्चा आहे. घरात 36 दिवस उलटले आहेत. आठवडाभर घरात धिंगाणा घातलेल्या सदस्यांची विकेंडला भाऊच्या धक्क्यावर चांगलीच शाळा भरते. या आठवड्यात घरातील कोणीही आऊट झालं नाही त्यामुळे सगळेच खुश आहेत. दरम्यान नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे जो पाहून प्रेक्षक म्हणाले "असं काय तर दाखवत जावा", बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलं? पाहूयात.
बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांची नक्कल करताना दिसत आहेत. डीपी दादा वैभव झाला आहे. जान्हवी निक्की आणि सूरज अरबाजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे.
advertisement
मागच्या आठवड्यात निक्की आणि अरबाज यांच्यात झालेली भांडणं डीपी दादा, सूरज आणि जान्हवी यांनी रिक्रिएट केली. या तिघांची मिमिक्री पाहून निक्की, अरबाजसह घरातील सगळ्यांच सदस्यांना हसू आवरेनासं झालं. या तिघांच्या या धम्माल मस्तीनं घरातील दिवसाची दमदार सुरूवात झाली.
बिग बॉसचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच खुश झाले. त्यांनाही हसू आवरलेलं नाही. एका युझरनं लिहिलंय, "अस काही तरी दाखवत जा बिग बॉस". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "खऱ्या पात्रापेक्षा याच पात्रांनी धमाल केली आहे". आणखी एका युझरनं लिहिलंय, "अशीच कॉमेडी दाखवत जा आणि कधीतरी भांडणं. मग बघायला मज्जा येईल".
advertisement
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात रद्दी टास्क पार पडणार आहे. घरातील असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना रद्दीत टाकलं जाणार आहे. स्वत:चं डोकं नसणाऱ्यांना, खेळातला समज नसणाऱ्या, स्वत:ची मतं नसणाऱ्या, घरातल्या गद्दार व्यक्तीला सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 02, 2024 3:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
"असं काय तर दाखवत जावा", बिग बॉसने असं काय दाखवलं की प्रेक्षक झाले खुश, पाहा VIDEO







