Madhuri Dixit : नव्या सिनेमासाठी माधुरी दीक्षितचं सिद्धिविनायकाला साकडं, सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या माधुरीसाठी मंदिर परिसरात खास सुरक्षा तैनात करण्यात आली होती. माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील मंदिर परिसरात गर्दी केली होती
मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी पंचक या मराठी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पंचक हा माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला सिनेमा येत्या 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. सिनेमा रिलीजच्या 2 दिवस आधी माधुरी दीक्षितनं प्रभादेवीच्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं आहे. पंचक सिनेमाच्या यशासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी माधुरीसह तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि दोन्ही मुलं देखील उपस्थित होते. माधुरीनं सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतनाचे माधुरीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या माधुरीसाठी मंदिर परिसरात खास सुरक्षा तैनात करण्यात आली होती. माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील मंदिर परिसरात गर्दी केली होती. सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात माधुरीनं बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. सिद्धिविनायक मंदिराकडून माधुरी, तिचे पती श्रीराम नेने आणि मुलांचा यथयोग्य सन्मान करण्यात आला. नेने कुटुंबियांना सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
advertisement
सिद्धिविनायकाला गेलेल्या माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर माधुरीच्या दोन्ही मुलांनी देखील साऱ्याचं लक्ष वेधलं. माधुरीचा मुलगा अरीन नेने आणि रायन नेने यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. त्याचप्रमाणे माधुरीची सासू अनू नेने या देखील यावेळी उपस्थित होत्या.
advertisement
नवीन वर्षात रिलीज होणारा पंचक हा पहिला मराठी सिनेमा आहे. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 02, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhuri Dixit : नव्या सिनेमासाठी माधुरी दीक्षितचं सिद्धिविनायकाला साकडं, सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन