Kumar Sanu Controversy : 'माझी नणंद माझ्या नवऱ्यासोबत एकाच खोलीत...', कुमार सानूच्या Ex Wife चे खळबळजनक आरोप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kumar Sanu Controversy : कुमार सानूच्या पहिल्या पत्नी रीटा भट्टाचार्यने गंभीर आरोप करत त्यांच्या कुटुंबातील वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुंबई : ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू आजही आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. पण, आता त्यांच्या आयुष्यातील काही जुन्या आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कुमार सानूची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्यने एका मुलाखतीत कुमार सानू यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप गंभीर आणि वैयक्तिक आरोप केले आहेत, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
“माझी नणंद आणि कुमार सानू…”
रीटा भट्टाचार्यने ‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “कुमार सानूच्या वडिलांनी म्हातारपणी लग्न केलं होतं. त्यांच्या घरात लग्नानंतर प्रेमसंबंध असणं ही खूप सामान्य गोष्ट होती. कुमार सानूची एक विवाहित बहीण होती, तिला तीन मुलं होती आणि तिचा नातूही झाला होता, पण तिने तिच्या नवऱ्याला सोडून तिच्या प्रियकराला सोबत घेऊन माझ्या घरी आली होती.”
advertisement
रीटा पुढे म्हणाली, “मी कुमार सानूला सांगितलं होतं की, तिच्यावर चुकीचा परिणाम होईल, पण तो खुश होता. कारण त्यालाही तेच करायचं होतं. माझी नणंद कुमार सानूसोबत रात्रभर एकाच खोलीत असायची. दोघे एकत्र झोपायचे, रात्रभर गप्पा मारायचे आणि जेवायचे. कुमार सानूच्या घरातील सगळ्यांचेच बाहेर प्रेमसंबंध होते. तिच्यामुळेच आमची घरं तुटली”
advertisement
कुमार सानूचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत!
रीटाने केलेले हे आरोप खूपच गंभीर आहेत, ज्यामुळे कुमार सानूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रीटाने केलेल्या या खुलास्यांवर कुमार सानू काय प्रतिक्रिया देतात, हे आता पाहणं महत्त्वाचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kumar Sanu Controversy : 'माझी नणंद माझ्या नवऱ्यासोबत एकाच खोलीत...', कुमार सानूच्या Ex Wife चे खळबळजनक आरोप