advertisement

Ramayana Movie: रामायणमधील रणबीर कपूरचा लूक लीक! ४००० कोटी खर्चूनही नेटकरी नाराज; 'या' एका कारणामुळे होतेय टीका

Last Updated:

'रामायण' चित्रपटातला रणवीर कपूरचा प्रभू श्री रामाच्या भूमिरकेतील लूक व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते नाराज झाले असून चाहते दिग्दर्शकांना आणि अभिनेत्याला ट्रोल करत आहेत.

bollywood movie ranbir kapoor prabhu shree ram in ramayana look viral on social media see netizens comments
bollywood movie ranbir kapoor prabhu shree ram in ramayana look viral on social media see netizens comments
टॉलिवूड अभिनेता प्रभास 'आदिपुरूष' चित्रपटामुळे कमालीचा ट्रोल झाला होता. चित्रपटातील एकंदरित लूकमुळे आणि चित्रपटाच्या व्हिएफएक्समुळे दिग्दर्शक तुफान ट्रोल झाला होता. आता त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला 'रामायण' चित्रपट चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधल्या बिग बजेट चित्रपटामध्ये रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. आता अशातच चित्रपटाचा एक लूक व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते नाराज झाले असून चाहते दिग्दर्शकांना आणि अभिनेत्याला ट्रोल करत आहेत.
'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये रिलीज होणार असून त्याचा दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर, 'रामायण' चित्रपट महाभारतावर आधारित आहे. अद्याप चित्रपटातील एकाही कलाकाराचा लूक निर्मात्यांनी रिव्हिल केलेला नाही. दरम्यान, एका वेबसाईटने  रणवीरचा चित्रपटातला लूक रिव्हिल केलेला आहे. तोच आता सोशल मीडियावर दिग्दर्शकांना आणि रणवीरला प्रभू श्री रामाच्या लूकवरून नेटकरी ट्रोल करीत आहेत.
advertisement
रेडिफवर रणवीरचा प्रभू श्री रामाच्या भूमिकेतला लूक व्हायरल होतोय. 'झूम' या वेबसाईटने 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूरचे प्रभू श्री रामाच्या अवतारातले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो शुटिंगवर परतताना दिसत आहे. या लूकमध्ये रणबीरने भगव्या रंगाचा धोतर वेअर केलेला दिसत आहे. पण अभिनेत्याच्या चित्रपटातल्या लूकवर नेटकरी पूर्णपणे खूश नाहीत. "एवढे मोठे बजेट असूनही, दिग्दर्शक एक चांगला विग सुद्धा लावू शकले नाहीत का?", असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
advertisement
दरम्यान, रणवीरचा हा फोटो केव्हाचा आहे? याचा खुलासा झालेला नाही. 'रामायण' चित्रपटाचे बजेट 4000 कोटी असल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याचा चित्रपटातला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चित्रपटामध्ये वापरलेल्या विगबद्दल नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहे. रेडिटवर रणबीरचा लूक समोर आल्यानंतर, बॉलिवूड ड्युप्लिकेट केस आणि दाढी वापरण्यात खरोखरच वाईट असल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, असं दिसतंय की तुम्ही 'आदिपुरुष'कडून काहीही शिकलेले नाही. तर, काही लोकांनी चित्रपटाच्या लूकवरून दिग्दर्शकाला आणि अभिनेत्याला ट्रोल करणं चुकीचं आहे. ट्रेलर येण्याची वाट पाहूया, असं काही फॅन्सचं म्हणणं आहे. 
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ramayana Movie: रामायणमधील रणबीर कपूरचा लूक लीक! ४००० कोटी खर्चूनही नेटकरी नाराज; 'या' एका कारणामुळे होतेय टीका
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement