Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' लवकरच घेणार निरोप? भारत गणेशपुरे म्हणाले 'चॅनेलकडून आम्हाला...'
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'चला हवा येऊ द्या' हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता या शोमधील प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी चला हवा येऊ द्या विषयी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई : झी मराठीचा शो 'चला हवा येऊ द्या' ला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. याचं सेलिब्रेशन देखील पार पडलं. पण गेल्या अनेक दिवसांपासून हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी या शोचे दिग्दर्शक आणि लेखक निलेश साबळे यांनी या शोमधून ब्रेक घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कुशल बद्रिके लवकरच एका नव्या हिंदी शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळेच हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता या शोमधील प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी चला हवा येऊ द्या विषयी महत्वाची माहिती दिली आहे.
भारत गणेशपुरे यांनी नुकतंच टीव्ही 9 ला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हा शो बंद होणार की चालू राहणार याविषयी माहिती दिली आहे. जी ऐकून चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
Miss World 2024: मानुषी छिल्लरनंतर भारताला पुन्हा मिळणार नवी मिस वर्ल्ड? कोण आहे सिनी शेट्टी ?
याविषयी बोलताना भारत गणेशपुरे म्हणाले की, "सध्या तरी आम्ही सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयीच्या चर्चा ऐकत आहोत. पण, चॅनेलकडून आम्हाला अद्याप तरी असा कोणताही मेसेज आलेला नाही. चला हवा येऊ द्याचं मार्च महिन्यातील शुटिंगचं शेड्युल लागलेलं आहे. हे शेड्युल आम्हाला कळवण्यातही आलं आहे. त्यामुळे तसं या महिन्यात शुटिंग होईल. मात्र, हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं अधिकृतरित्या तरी आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही," असं म्हणत भारत गणेशपुरे यांनी शो बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या' चा मंच हे एक हक्काचं व्यासपीठ आहे. मराठी सहित अनेक बॉलिवूड चित्रपटांचं प्रमोशन देखील या मंचावर झालं. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान ते अक्षय कुमार, श्रीदेवी, माधुरी दीक्षित यांनी देखील या मंचावर हजेरी लावली आहे. बघता बघता या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमातुन भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे आणि सागर कारंडे या सगळ्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. सागर कारंडेने मध्यंतरी हा शो सोडला. तर आता या शोमधून तब्येतीच्या कारणामुळे निलेश साबळे यांनी एक्झिट घेतली आहे. श्रेया आता या कार्यक्रमाची नवी सूत्रसंचालक असणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2024 8:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' लवकरच घेणार निरोप? भारत गणेशपुरे म्हणाले 'चॅनेलकडून आम्हाला...'





