Nana Patekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले नानांच्या फार्महाऊसवर, घेतलं बाप्पांचं दर्शन; पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nana Patekar: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरीही बाप्पा बसवण्यात आलाय. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांच्या गणपती दर्शनासाठी हजेरी लावली.
मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की मुंबई–पुण्यापासून कोकण, विदर्भापर्यंत सगळीकडे उत्सवाचा जल्लोष दिसतो. सेलिब्रिटींपासून सामान्य घरांपर्यंत बाप्पाचं आगमन एकसारखं आनंददायी. अशातच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरीही बाप्पा बसवण्यात आलाय. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांच्या गणपती दर्शनासाठी हजेरी लावली आणि या क्षणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला.
पुण्यातल्या सिंहगडाच्या पायथ्याशी, डोणजे गावातलं नाना पाटेकरांचं हे सुंदर फार्महाऊस आहे. मोठ्या आलिशान बंगल्यांपेक्षा पूर्ण वेगळं, साधं, नैसर्गिक वातावरणातलं. इथे नाना पाटेकर अत्यंत साधं जीवन जगतात. अंगणात झाडं, फुलं, गोठ्यात गाई, आणि स्वयंपाकासाठी चुलीवर शिजलेलं जेवण हे सगळं या घराला खास बनवतं. पुस्तकांसाठी एक वेगळा कप्पा आहे, जिथे नाना तासनतास वाचन करतात.
advertisement
यावर्षी गणेशोत्सवासाठी “नानाची वाडी”त विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती. बाप्पाचं सुंदर मखर, पारंपरिक सजावट आणि ग्रामिण वातावरण पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना सुखावणारं होतं. नाना स्वतः बाप्पाची आरती करतात, प्रसाद वाटतात आणि आलेल्या पाहुण्यांना आपुलकीनं जेवायला बसवतात.
या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानाच्या फार्महाऊसवर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. दर्शनानंतर नाना, फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र स्नेहभोजनही केलं.
advertisement
advertisement
नाना पाटेकरांचं हे फार्महाऊस केवळ गणेशोत्सवासाठीच चर्चेत राहत नाही, तर अनेक कलाकार आणि मित्रमंडळी इथे वेळोवेळी येऊन गेले आहेत. नाना स्वतः शेतात काम करतात, गाई-गुरांची काळजी घेतात आणि साधेपणातही खऱ्या आयुष्याचा आनंद घेतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 8:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nana Patekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले नानांच्या फार्महाऊसवर, घेतलं बाप्पांचं दर्शन; पाहा VIDEO


